-
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या मांस विक्रीच्या दुकानाला विरोध
-
नगरसेवक नफीस याला अटक, तर अन्य २ धर्मांध पसार
अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संत यांच्यावर आक्रमण आणि त्यांच्या हत्या होण्याच्या घटना अधिक आहेत. तेथे हिंदुत्वनिष्ठ भाजपचे राज्य आहे. भाजपच्या राज्यात तरी हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे आणि हत्या रोखल्या जातील आणि आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई होईल, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) : येथील काकोड भागात ‘हिंदु जागरण मंचा’च्या राहुल नावाच्या कार्यकर्त्यावर ३ धर्मांधांनी चाकूद्वारे आक्रमण केले. यात येथील नगरसेवक नफीस याचा समावेश आहे.
या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी नफीस याला अटक केली असून अन्य दोघांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नफीस याच्या निकटवर्तीयाचे येथे मांस विक्रीचे दुकान आहे. त्याला राहुल याने विरोध केला होता. यावरून दोघांमध्ये वाद चालू होता. त्यातूनही हे आक्रमण झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात