कित्येक वर्षांची पारंपरिक वाट बंद केल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे मांडणार ! – बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री
- हाच का ख्रिस्त्यांचा सर्वधर्मसमभाव ?
- ख्रिस्त्यांचा छत्रपती शिवरायांविषयीचा द्वेष जाणा !
- यातून त्यांची पोर्तुगीजधार्जिणी मानसिकता लक्षात येते. ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, हे अनेक मान्यवरांचे बोल यातून खरे ठरत आहेत !
मडगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला बेतुल येथील किल्ला आणि स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेले श्री राखणदेव देवस्थान या दोन्ही ठिकाणी जाणारा पारंपरिक रस्ता आणि पायवाट जागेच्या ख्रिस्ती मालकाने बंद केल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेविषयी स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर स्थानिक आमदार, तसेच उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १५ आणि १६ ऑक्टोबर या दिवसांत बेतुल येथील किल्ला आणि श्री राखणदेव देवस्थान येथे जाणारी वाट कुंपण घालून बंद करण्यात आली.
याविषयी उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेतुल येथील किल्ला हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. या ठिकाणी जाणारी वाट अडवल्याने पर्यटकांना या ठिकाणी भेट देण्यास किंवा स्थनिक मासेमारांना व्यवसायात अडथळा निर्माण झाला आहे. याविषयी गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे बोलून या विषयावर तोडगा काढणार आहे. पारंपरिक वाट अडवल्याच्या प्रकरणी स्थानिक रितसर तक्रारही नोंदवणार आहेत. लोकांना कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्यास भाग पाडू नये.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘ बेतुल येथील किल्ला आणि श्री राखणदेव देवस्थान येथे जाणारी ही वाट ही अनेक वर्षांची वाट आहे. हा परिसर पर्यटनस्थळ आहे आणि या ठिकाणी ‘कॅप्टन ऑफ पार्टस’ची जागा आहे. या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास घटनास्थळी चारचारी किंवा दुचाकी वाहनही जाऊ शकत नाही. कित्येक वर्षांची ही पारंपरिक वाट जागेच्या मालकाने बंद केली आहे. स्थानिक पंचायत, ग्रामस्थ आदींच्या माध्यमातून जागेच्या मालकाशी या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्याची विनंनी केली होती; मात्र अजूनही यावर तोडगा निघू शकलेला नाही. पारंपरिक वाट अडवूनही सुमारे ३०० ते ४०० स्थानिकांनी संयम पाळला आहे. कायदेशीरित्या यावर तोडगा निघाला पाहिजे, असे स्थानिकांनाही वाटत आहे.’’ (चर्चचा पाठिंबा असल्याशिवाय ख्रिस्ती एवढे धाडस करणार नाहीत, हे राजकारण्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
भूमालक आयडा नोरोन्हा यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास आहे विरोध
बेतुल येथील सर्वेक्षण क्रमांक ७२/१३ ही भूमी आयडा नोरोन्हा यांच्या मालकीची असून या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास त्यांनी तीव्र शब्दांत विरोध केल्याचे उघड झाले आहे. जागेच्या मालकीण आयडा नोरोन्हा यांनी १५ फेब्रुवारी २०१६ मध्ये अशा आशयाचे पत्र स्थानिक नाकेरी पंचायतीच्या सरपंचांना दिले आहे. आयडा नोरोन्हा पत्रात म्हणतात, ‘‘पोस्तावाडा, बेतुल येथील माझ्या मालकीच्या सर्वे क्रमांक ७२/१३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची सिद्धता चालू आहे आणि या संभाव्य कृतीला माझा तीव्र विरोध आहे.’’
शिवाजी महाराजांच्या किल्ल्याकडे जाणारा मार्ग त्वरित मोकळा करा ! – राजेंद्र वेलींगकर
शिवाजी महाराजांच्या बेतुल येथील किल्ल्याकडे जाणारा मार्ग त्वरित मोकळा करावा, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ राजेंद्र वेलींगकर यांनी केली आहे.
बेतुल येथील पारंपरिक मांडावरही हिंदूंच्या रितीरिवाजांना होत आहे विरोध !
बेतुल येथील एका पारंपरिक मांडावरही हिंदूंना उत्सव, रितीरिवाज आदी साजरे करण्यास येथील ख्रिस्त्यांकडून चर्चच्या पाठिंब्याने विरोध होत आहे. या विरोधामुळे कित्येक वर्षे मांडावर चालू असलेली परंपरा बंद पडली आहे आणि यामुळे स्थानिक हिंदूंच्या मनात तीव्र असंतोष आहे. (हाच का ख्रिस्त्यांचा सर्वधर्मसमभाव ! कि तो केवळ हिंदूंनीच जपायचा ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात