‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रशासनाला पत्र पाठवावे !
मुंबई : ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. हा विषय राजकारणाचा नाही, तर हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आहे. आम्ही सनातन धर्माविषयी बोलत आहोत. हा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा प्रश्न असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी केंद्रशासनाला पत्र पाठवून ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करावी, अशी मागणी अभिनेत्री पायल रोहतगी यांनी केली आहे. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्या आणि हिंदूंच्या भावना जाणीवपूर्वक दुखावणार्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटावर बंदी घालावी’, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाचा संदर्भ देऊन अभिनेत्री पायल रोहतगी यांनी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला असून यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या मागण्यांचे समर्थन केले आहे.
सामाजिक माध्यमांवरील समर्थकांना याविषयी कळावे, यासाठी पायल रोहतगी यांनी व्हिडिओ सिद्ध करून प्रसारित केला आहे. यामध्ये अभिनेत्री पायल यांनी हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनातील खालील सूत्रांना पाठिंबा दर्शवला आहे.
१. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावातून ‘लक्ष्मी फटाके’ या लक्ष्मीदेवीचा अवमान करणार्या फटाक्यांना प्रोत्साहन मिळू शकते.
२. ‘लक्ष्मी बॉम्ब’ नावाने चित्रपट काढणारे ईदच्या निमित्ताने ‘आयेशा बॉम्ब’, ‘शबीना बॉम्ब’, ‘सलमा बॉम्ब’, ‘फातिमा बॉम्ब’ यांसारख्या नावांनी चित्रपट काढण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ? आणि चित्रपट परिनिरीक्षण मंडळ अशा नावाला मान्यता देऊ शकेल का ? तसेच गृहमंत्रालय अशा चित्रपटांचे प्रदर्शन होऊ देईल का ?
३. ‘मोहम्मद : दि मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटामुळे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतील म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रशासनाकडे या चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. त्याप्रमाणे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावरही बंदीची मागणी करता येईल.
४. या चित्रपटात मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांचे संबंध दाखवून हेतूतः ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. हिंदु-मुसलमान एकतेच्या नावाखाली दुरावाच निर्माण करण्याचा प्रकार याद्वारे होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात