Menu Close

फ्रान्समध्ये शिक्षकाच्या शिरच्छेदानंतर धर्मांधांवर कठोर कारवाई चालू

५१ इस्लामी संघटनांवर बंदी घालण्याचा विचार

एका घटनेनंतर फ्रान्सने कठोर कारवाई चालू केली, तर भारतात ३ दशके जिहादी आतंकवाद्यांचा हैदोस चालू असतांना भारत निष्क्रीयच राहिला ! याला आतापर्यंतचे शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

पॅरिस (फ्रान्स) : येथील एका शाळेतील वर्गात महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवल्यावरून धर्मांधाने एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याच्या घटनेनंतर फ्रान्स पोलिसांनी जिहाद्यांवर कारवाई करण्यासाठी अनेक ठिकणी धाडी घातल्या आहेत. ८० हून अधिक ठिकाणी अन्वेषण चालू करण्यात आले आहे, तसेच ५१ इस्लामी संघटनांवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे. यात काही मोठ्या संघटनाही आहेत. इतकेच नाही, तर २१३ विदेशी लोकांची फ्रान्समधून हकालपट्टीही करण्यात येणार आहे. यातील १५० जण सध्या फ्रान्सच्या कारागृहात आहेत. यांच्यावर इस्लामी कट्टरतावादाचे अनुसरण केल्याचा आरोप आहे.

शिक्षकाची हत्या करणार्‍या धर्मांधाचे समर्थन करणार्‍यांना शोधून त्यांच्यावरही कारवाई करण्यता येत आहे. या धर्मांधाच्या कुटुंबातील चौघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, तसेच त्याच्या वडिलांनी सामाजिक माध्यमांतून शिक्षकाच्या विरोधात लिहिणार्‍या त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. शिक्षकाचा शिरच्छेद करणार्‍या धर्मांधाचे नाव ‘अब्दुल्लाख अँजोरोख’ असे आहे. जेव्हा तो ६ वर्षांच्या होता, तेव्हा तो शरणार्थी म्हणून फ्रान्समध्ये आला होता. (शरणार्थी धर्मांध किती कट्टर असतात आणि ते ज्या देशात जातात तेथे हिंसा करतात, हे लक्षात घेता अशांसारख्या धर्मांध शरणार्थींना भारताने कधीही आश्रय देऊ नये, हेच शिकायला हवे ! तसेच घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची लवकरात लवकर हकालपट्टी केली पाहिजे ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *