राष्ट्रविरोधी प्रक्षोभक भाषणे करणार्या एम्आयएमच्या नेत्यांना रोखू न शकणारे पोलीस राष्ट्रप्रेमी हिंदूंच्या नेत्यांवर तत्परतेने बंदी घालतात, हे लक्षात घ्या !
- सामूहिक शनैश्वर पूजेच्या कार्यक्रमास उपस्थित रहाण्यास पोलिसांकडून बंदी !
- १६ ते २२ एप्रिल या कालावधीतील सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग आणि भाषण यांवर बंदी !
श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना अलापे येथे १६ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या वार्षिक सामूहिक शनैश्वर पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास पोलीस आयुक्त चंद्रशेखर यांनी बंदी घातली आहे, तसेच १६ ते २२ एप्रिल या कालावधीत होणारी कोणतीही सार्वजनिक सभा आणि कार्यक्रम यांत सहभागी होणे अथवा प्रत्यक्ष किंवा इतर माध्यमांद्वारे भाषण करणे, यांवरही कलम १४४ नुसार बंदी घालण्यात आली आहे. श्री. मुतालिक येथे वर्ष २००९ मध्ये झालेल्या पबवरील आक्रमणाच्या खटल्यासंबंधी न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी आले होते.
या बंदीवर प्रतिक्रिया देतांना श्री. मुतालिक म्हणाले, हा राज्यशासनाने अवलंबलेल्या हिंदुविरोधी धोरणाचाच एक भाग आहे. म्हैसूर येथे ३ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. मलाही राज्यातील ८ ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हिंदु जनजागृती समितीचे जगदीश कारंथ यांना पुत्तूर येथील श्रीरामनवमीच्या कार्यक्रमात उपस्थित रहाण्यापासून रोखले गेले. याचा अर्थ राज्यशासनाने हिंदूंना दडपून टाकण्याचे षड्यंत्र आखले आहे. मी मंगळुरू येथे न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी आलो होतो. मला पूजेच्या कार्यक्रमात जाण्यास बंदी करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मी या कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण करणार याचे स्वप्न पोलिसांना पडले होते का ? माझ्याविरुद्ध ९० खटले प्रलंबित आहेत, असे पोलीस म्हणतात. त्यातील १३ वगळता इतर खटल्यांत न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले आहे. याचाच अर्थ न्यायालय माझा आदर करते; मात्र पोलीस माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालतात, असेही श्री. मुतालिक म्हणाले. (राष्ट्रप्रेमी हिंदूंना कार्य करण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात