Menu Close

‘ट्विटर’वर आक्षेपार्ह चित्र प्रसारित करून अधिवक्त्या दीपिका राजावत यांचा हिंदूंना बलात्कारी दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न

देवीच्या उपासकांना बलात्कारी दाखवणार्‍या अधिवक्त्या दीपिका राजावत यांचा यातून पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो. हिंदू सहिष्णु असल्यामुळेच हे सहन करतात. देशात धर्मांधांकडून राजरोसपणे बलात्काराच्या घटना घडत असतांना ते सत्य मांडण्याचे धारिष्ट्य अधिवक्त्या राजावत यांच्यामध्ये आहे का ?

मुंबई : कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्यातून हटवण्यात आलेल्या अधिवक्त्या दीपिका राजावत यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या ‘ट्विटर अकाऊंट’वरून आक्षेपार्ह चित्र प्रसारित केले आहे. हे चित्र प्रसारित करून त्यांनी देवीच्या उपासकांना पर्यायाने हिंदूंना बलात्कारी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी ‘ट्विटर’वर ‘#Arrest_Deepika_Rajawat’ या ‘हॅशटॅग ट्रेण्ड’द्वारे अधिवक्त्या दीपिका राजावत यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.

अधिवक्त्या दीपिका राजावत यांनी ‘विडंबना’ असे नाव देऊन हे आक्षेपार्ह चित्र प्रसारित केले आहे. त्यामध्ये ‘अन्य दिवशी’ असे लिहून महिलेवर बलात्कार करणारी व्यक्ती दाखवण्यात आली आहे; मात्र ‘नवरात्र’ असे लिहून तीच व्यक्ती देवीचे पूजन करतांना दाखवली आहे. यातून ‘नवरात्रीत देवीची उपासना करणारे हिंदू अन्य दिवशी स्त्रियांवर बलात्कार करतात’, असे दाखवण्यात आले आहे.

प्रसिद्धी मिळवण्यासाठी बलात्काराचा खटला लढत असल्यामुळे न्यायालयाने अधिवक्त्या दीपिका राजावत यांना खटल्यातून हटवले होते !

अधिवक्त्या राजावत या काश्मिरी अधिवक्त्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात त्या पीडितेच्या अधिवक्त्या होत्या. वर्ष २०१९ मध्ये न्यायालयाने त्यांना या खटल्यातून हटवले. ‘राजावत यांना या खटल्यात काही रस नाही. त्या न्यायालयात येत नाहीत. या खटल्यातून त्या केवळ प्रसिद्धी मिळवत आहेत’, अशी पठाणकोट उच्च न्यायालयात याचिका करून पीडितेच्या कुटुंबियांनी अधिवक्त्या राजावत यांना या खटल्यातून हटवण्याची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य करून राजावत यांना या खटल्यातून बाजूला करण्यात आले. (बलात्काराच्या खटल्याचा प्रसिद्धीसाठी उपयोग करण्यासारखा हीन विचार बाळगणार्‍या अधिवक्त्या दीपिका राजावत यांच्याकडून कोणती अपेक्षा करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *