यावरून अवैधरित्या घरे बांधून धर्मांध त्याचे मुसलमान वस्तीत कसे रूपांतर करतात ते दिसून येते. यालाच ‘लॅण्ड जिहाद’ म्हणतात ! अशी अवैध बांधकामे मडगावच्या मोतीडोंगर येथेही आहेत. त्या ठिकाणी गुंडगिरीही होते; पण राजकारणी त्याविरोधात कधीच आवाज उठवत नाहीत; कारण त्यांना मतपेढी जपायची असते !
मडगाव : चिंचिणी गावातील बायदा भागातील स्थानिक ‘हिलॉक’ (पठार) भागाचे मुस्लिमवाडा असे नामांतर करण्यास विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. आम्हाला हा पठार दुसरा मोतीडोंगर किंवा झुवारीनगर होऊ द्यायचे नाही, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. बायदा या ठिकाणी उभारलेल्या अवैध बांधकामाविरोधात लढा देणे, तसेच निवडणूक अधिकार्यांनी ‘ऑईली बायदा’ हे नाव तसेच ठेवावे या ग्रामस्थांच्या मागणीला ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ या संघटनेने पाठिंबा दिला आहे.
ग्रामस्थांच्या एका गटाने चिंचिणीच्या सरपंच इनासिन्हा रिबेलो यांना सर्वांच्या स्वाक्षर्या असलेले निवेदन सादर केले आहे. सरपंचानी या तक्रारीविषयी पंचायतीच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. येथील एक नागरिक सिडनी डिमेलो याविषयी प्रसिद्धीमाध्यमांना म्हणाले, ‘‘बायदा येथील हरित पठाराचे मोतीडोंगर किंवा झुवारीनगर यामध्ये रूपांतर होण्याचे थांबवण्यासाठी स्थानिक लोक एकत्र आले आहेत. या भागातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या भागात झोपडपट्टी येण्यापासून रोखावे, या विषयीच्या निवेदनावर जवळजवळ ६१५ लोकांच्या स्वाक्षर्या आहेत. या भागातील अवैध बांधकामे हटवली नाहीत, तर एक दिवस हा भाग म्हणजे दुसरा मोतीडोंगर किंवा झुआरीनगर होईल. कोमुनिदादची भूमी असलेल्या या भागात जवळपास २० अशी बांधकामे आहेत की, ज्यांच्याविषयी प्रश्नचिन्ह आहे. (ही अवैध बांधकामे उभी राहीपर्यंत पंचायत काय करत होती ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पंचायतीने या सर्वांची कागदपत्रे तपासावी आणि ती त्यांच्याकडे नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी. जर स्थानिकांना न्याय मिळाला नाही, तर स्थानिक लोकच याच्या विरोधात कृती करतील. चिंचिणी गावातील सर्व ग्रामस्थांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे आणि लोकांना रिव्हॉल्युशनरी गोवन्स या संघटनेचा पाठिंबा आहे.’’ सरंपच इनासिन्हा यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले की, बायदा भागाचे ‘मुस्लिमवाडा’ असे नामांतर करण्यात तिच्या वडिलांचा सर्वांत आधी विरोध होता. निवडणूक अधिकार्यांनी या भागाचे मुस्लिमवाडा असे नामांतर का केले, हे पंचायतीलाही ठाऊक नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात