Menu Close

भाग्यनगर येथे हिंदु तरुणीची धर्मांध प्रियकराकडून हत्या

हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने त्या धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात आणि आत्मघात करून घेतात !

भाग्यनगर (तेलंगाणा) : येथे हिंदु तरुणीची तिचा प्रियकर सय्यद मुस्तफा आणि त्याचा भाऊ जमील यांनी अत्यंत क्रूरतेने हत्या केली. ही घटना १७ ऑक्टोबरला येथील रेन बाजार येथे रात्री घडली.

ही तरुणी मुळची संगारेड्डी जिल्ह्यातील करंगुट्टी गावातील आहे. काही काळापूर्वीच ती भाग्यनगर येथे रहाण्यास आली होती. ती विधी शाखेची विद्यार्थिनी होती, तसेच ‘पेटा’ची कार्यकर्ती होती. याच संघटनेशी मुस्तफाही जोडलेला होता. त्यांची भेट होऊन त्यांच्यात प्रेम निर्माण झाले होते. काही दिवसांनी मुस्तफा याने तिच्याशी संबंध तोडणे चालू केले. यामुळे या तरुणीने १७ ऑक्टोबरला रात्री त्याच्या घरी जाऊन जाब विचारला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून मुस्तफा आणि त्याचा भाऊ जमील यांनी तिची चाकूने भोसकून हत्या केली. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *