नवी देहली : राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सेवारत असणार्या हिंदु जनजागृती समितीचा १८ वा वर्धापनदिन १७ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी झाला. समितीने या १८ वर्षांत धर्मशिक्षण, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण, धर्मरक्षण आणि हिंदुसंघटन या ५ सूत्रांवर यशस्वीपणे कार्य केले. आज संपूर्ण देशात समितीचे कार्य चालू आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समिती कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर या दिवशी #18YearsOfHJSHindu_Rashtra हा ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ करण्यात आला होता. यावर धर्मप्रेमींनी समितीकडून चालवण्यात येणार्या विविध अभियांनाना मिळालेल्या यशाविषयी, कार्यक्रमांविषयी ट्वीट केले. तसेच आभार व्यक्त केले. हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ५ व्या क्रमांकावर होता आणि यावर २५ सहस्रांहून अधिक जणांना ट्वीट्स केले. Hindu Janajagruti Samiti, Hindu Rashtra हे ‘की-वर्ड’ही (शब्दही) ट्रेंड झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात