पीडित महिला आणि धर्मप्रेमी यांच्याकडून भूमिकेचे स्वागत; मात्र पुरो(अधो)गामी मंडळींना पोटशूळ
भारतात आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला सहस्रावधी हिंदु युवती बळी पडल्या आहेत. या भयाण वास्तवाविषयी मूग गिळून गप्प रहायचे आणि ‘लव्ह जिहाद’चा विषय काढल्यावर घटनाविरोधी ठरवायचे, हे पुरो(अधो)गाम्यांचे ढोंगी पुरोगामीत्व लक्षात घ्या !
मुंबई : महाराष्ट्रातील महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्याविषयी २० ऑक्टोबर या दिवशी महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महिलांची छेडछाड, विनयभंग, ‘कोरोना उपचार केंद्रां’मधील महिला रुग्णांवरील बलात्कार यांसह ‘लव्ह जिहाद’चे वाढते प्रकार यांविषयी त्यांनी चर्चा केली. रेखा शर्मा यांच्या या भूमिकेविषयी पीडित हिंदु महिला आणि हिंदु धर्मप्रेमी यांनी स्वागत केले आहे; मात्र पुरो(अधो)गामी मंडळींना पोटशूळ उठल्याचे सामजिक माध्यमांवरील प्रतिक्रियांतून दिसून येत आहे.
रेखा शर्मा यांनी राज्यपालांच्या घेतलेल्या भेटीविषयी महिला आयोगाच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावरून ‘ट्वीट’करून माहिती देण्यात आली आहे.
या ‘ट्वीट’मध्ये ‘लव्ह जिहाद’या शब्दावरून पुरोगामी मंडळींनी रेखा शर्मा यांना हिंदुत्वनिष्ठ ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे मुसलमानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न असून ही भूमिका राज्यघटनेच्या विरोधात असल्याची आवई पुरो(अधो)गामी मंडळींनी उठवली आहे; मात्र काही पीडितांनी आणि धर्मप्रेमी यांनी याविषयीचे व्हिडिओ प्रसारित करून लव्ह जिहादची वस्तूस्थिती मांडून रेखा शर्मा यांना पाठिंबा दर्शवला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात