भुवनेश्वर (ओडिशा) : स्थानिक पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने एकदा एक वासरू अनवधानाने मारून टाकले. त्यासाठी प्रायश्चित्त म्हणून त्याने तपश्चर्या केली. प्रायश्चित्त घेण्याच्या कृतींपैकी एक म्हणजे गोसागरेश्वर तलावामध्ये स्नान करणे. आजही लोक ज्यांनी चुकून गाय मारली आहे किंवा बांधून ठेवलेली गाय मरू देतात, ते पापापासून शुद्ध होण्यासाठी येथे विधीवत् स्नान करतात. स्थानिकांसाठी ही एक पवित्र जागा आहे. असे असतांना आज ओडिशा शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गोसागरेश्वर मंदिराच्या जवळ असलेला पवित्र तलाव दुरुस्तीच्या अभावाने आणि चुकीच्या नियोजनामुळे त्याचे साचलेल्या गढूळ पाण्याच्या टाकीत रूपांतर झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून पाणी बाहेर पडण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. संपूर्ण पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढली की, ते मंदिरात प्रवेश करते. (हे शासन आणि प्रशासन यांच्या लक्षात का येत नाही ? हिंदु मंदिरांच्या दुरुस्तीकडे सर्रासपणे दुर्लक्ष करणार्या निधर्मी शासनाकडून दुरुस्तीची अपेक्षा करता येईल का ? हिंदूंच्या मंदिरांची स्थिती चांगली ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. गोसागरेश्वर तलावाजवळ मंदिरांचा एक समूह आहे. हा तलाव १३ व्या शतकात बांधण्यात आला आहे. यात नैसर्गिक भूमिगत पाणी वसंत ऋतूत जमा होते आणि तलाव भरल्यावर बिंदू सागरमध्ये ईशान्य कोपर्यातील वाहिनीद्वारे सोडण्यात येते. शतकानुशतके टाकीमधील पाण्याची पातळी स्थिर रहाते आणि पाण्याचा प्रवाह कायम रहातो.
२. गोसागरेश्वर संकुलात विविध देवतांना समर्पित ११ मंदिरे आहेत. प्रतिष्ठित देवता शिव आहेत. या मंदिराची शेवटची दुरुस्ती राज्य पुरातत्व विभागाने वर्ष १९९९ मध्ये केली. त्यांनी एक कंपाऊंड भिंत उभी केली, जी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह थांबवते.
४. ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’चे प्रकल्प समन्वयक अनिल धीर यांचे मत आहे की, जुन्या शहरांमधील जवळपास सर्व पवित्र तलाव सर्वत्र अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत आहेत. त्यांच्या पाण्यात तरंगणारा कचरा, प्लास्टिक आणि घरातील कचरा टाकण्यात आला आहे. त्यापैकी बरेच आता वापरले जात नाहीत.
५. प्रख्यात पर्यावरणतज्ञ डॉ. विश्वजित मोहंती यांच्या मते कूपनलिकेसाठी केलेल्या उत्खननामुळे अनेक नैसर्गिक झरे कोरडे पडले आहेत. या जलस्रोतांना स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी सेवा संस्थांचे साहाय्य घेता येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात