ख्रिस्त्यांचा चितेवर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न !
कोल्लम (केरळ) : केरळ राज्यातील कोल्लम येथील परवूर मंदिरात १० एप्रिल या दिवशी झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात घायाळ झालेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्यासाठी बिलिव्हर्स चर्चच्या वतीने संपूर्ण साहाय्य करण्यात येईल, असे चर्चच्या देहली येथील मुख्यालयाने म्हटले आहे. (मंदिरात आतषबाजी बघण्यासाठी गोळा झालेले हिंदू होते. त्यांना राज्य आणि केंद्र शासनाने तातडीचे साहाय्य केले आहे; मात्र धर्मांतर करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे, असे समजून बिलिव्हर्स चर्च या संधीचा अपलाभ घेण्यासाठी सिद्ध झाले आहे. अनेक नैसर्गिक आपत्तीत साहाय्य देण्याचे निमित्त करून हिंदूंचे धर्मांतर करायचा प्रयत्न या आधीही ख्रिस्त्यांनी केला आहेत. हिंदूंनी या पुतना मावशीच्या साहाय्यापासून सावध राहले पाहिजे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
कोल्लमपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ख्रिस्ती रुग्णालयात घायाळ हिंदूंवर विनामूल्य उपचार करण्यात येतील. अपघातग्रस्तांसाठी ५ सहस्र मच्छरदाण्या, औषधे, अन्नाची पाकिटे, कपडे पुरवण्यात येतील, असे चर्चच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. साहाय्यासाठी अमृतसर, चंदिगड, लक्ष्मणपुरी (लखनौ), देहली, उदयपूर आणि कोलकाता येथून निधी गोळा करण्यात येत आहे. (या निधीचा हिशेब कसा देणार कि तो धर्मांतराची लालूच दाखवण्यासाठी चर्चच्या तिजोरीत जमा होणार, याचे स्पष्टीकरण चर्चने केले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात