Menu Close

जंतर मंतर (नवी देहली) येथे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या विरोधात ‘युनायटेड हिंदू फ्रंट’कडून आंदोलन

चित्रपटाचे नाव आणि ‘लव्ह जिहाद’चे प्रसंग न पालटल्यास प्रखर विरोध करण्याची चेतावणी

हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर त्यांना असे आंदोलन करावे लागते, हे लज्जास्पद !

नवी देहली : येथील जंतर मंतर येथे ‘युनायटेड हिंदु फ्रंट’च्या कार्यकर्त्यांनी २३ ऑक्टोबर या दिवशी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने केली. त्यांनी या चित्रपटाचे नाव आणि ‘लव्ह जिहाद’चे प्रसंग हटवण्याची मागणी केली. ‘जर हे पालट केले नाही, तर मोठ्या प्रमाणात विरोध केले जाईल’, अशी चेतावणी त्यांनी दिली.

या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जय भगवान गोयल आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *