इस्लामी देशांत हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने असुरक्षित आहेत. याविषयी भारत सरकारने संबंधित देशांवर दबाव निर्माण करून हिंदूंचे आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यास बाध्य केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
ढाका (बांगलादेश) : नवरात्रीला प्रारंभ होण्यापूर्वी बांगलादेशातील फरीदपूर येथील बोअलमारी आणि नारायणगंजमधील अरैहजार येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी महंमद नयन शेख (वय १८ वर्षे) आणि महंमद राजू मृधा (वय २५ वर्षे) यांना अटक केली. सर्व पूजा मंडळे आणि मंदिरे यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना पूजा मंडळांना प्रशासनाने केल्या आहेत. प्रशासनाने कॅमेरे बसवण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले आहे.
यापूर्वी १ ऑक्टोबरच्या रात्री नृपेन मालो या हिंदु व्यक्तीच्या घरात धर्मांधांकडून श्री कालीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती; मात्र या घटनेत अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. (बांगलादेशमधील धर्मांध पोलिसांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात