Menu Close

(म्हणे) ‘महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍या मुसलमानेतर भारतियांना कारागृहात डांबा !’

जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्‍या डॉ. झाकीर नाईक याची इस्लामी देशांना पुन्हा चिथावणी

  • परत परत अशा प्रकारची चिथावणी देऊन डॉ. झाकीर नाईक किती जिहादी आणि कट्टर आहे, हे दाखवून देत आहे ! भारतातून पसार झालेल्या झाकीर याला तात्काळ भारतात आणून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी भारताने कठोर प्रयत्न केले पाहिजेत !
  • भारतात धर्मांधांकडूनच हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान केला जातो, हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण केले जाते, ही वस्तूस्थिती आहे. भारताने अशा धर्माधांना कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

कुआलालंपूर (मलेशिया) : महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍या मुसलमानेतर भारतियांना कारागृहात डांबण्यात यावे, अशी चिथावणी जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा डॉ. झाकीर नाईक याने इस्लामी देशांना पुन्हा दिली आहे.

डॉ. नाईक याने सौदी अरेबिया, इंडोनेशिया आदी इस्लामी देशांना चिथावणी देतांना पुढे म्हटले की, इस्लामविषयी नकारात्मक विचार पसरवणार्‍या आणि शिवीगाळ करणार्‍या मुसलमानेतर भारतियांची माहिती गोळा करण्यात यावी अन् संगणकात एकत्र करून ठेवावी. हे भारतीय इस्लामी देशांत येणार असल्यास त्यांनी इस्लामविषयी, पैगंबर यांच्याविषयी कधी आक्षेपार्ह विधाने, लिखाण केले आहे का ? हे पडताळता येईल आणि जर त्यांनी तसे केले असेल, तर त्यांना इस्लामी देशांत आल्यावर अटक करता येईल. माझ्या मते हे लोक बहुतेक भाजपचे भक्त आहेत आणि ते मुसलमान अन् इस्लाम यांच्या विरोधात गरळओक करत आहेत. त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या योजनेमुळे भीती निर्माण होईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *