अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संत यांच्या हत्या होण्याच्या घटना अधिक घडत आहेत. तेथे हिंदुत्वनिष्ठ भाजपचे राज्य आहे. भाजपच्या राज्यात तरी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखल्या जातील आणि आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई होईल, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
हमीरपूर (उत्तरप्रदेश) : येथील मुस्करा क्षेत्रातील बसायक भागात सिद्ध बाबा मंदिराचे पुजारी महंत रतीराम यांची हत्या करण्यात आली.
यासह लक्ष्मणपुरीजवळील काकोरीमध्येही एका साधूची हत्या करून त्यांचे शव लटकवण्यात आल्याची घटना घडली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात