Menu Close

मुसलमानबहुल मेवात (हरियाणा) येथील गावातील मंदिरामधील श्री दुर्गादेवाच्या मूर्तीची तोडफोड

मदरशाच्या मौलवीच्या आदेशावरून मूर्तीची तोडफोड झाल्याचा हिंदूंना आरोप

हरियाणामध्ये भाजपचे राज्य असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मेवात हा जिल्हा मुसलमानबहुल असतांना तेथील हिंदूंचे आणि मंदिरांचे रक्षण भाजप सरकारने करावे, असेच हिंदूंना वाटते !

मेवात (हरियाणा) : येथील नगीना भागातील माँडीखेडा गावामध्ये नवरात्रीमध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती; मात्र २० ऑक्टोबरला अज्ञातांकडून ही मूर्ती तोडण्यात आली. पोलिसांनी याविषयी गुन्हा नोंदवला आहे; मात्र घटनेच्या ६ दिवसानंतरही कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे की, अशा प्रकारची घटना यापूर्वी वर्ष २०१६ मध्येही येथे घडली होती. त्यांचा आरोप आहे की, मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या मदरशांतील मौलवीच्या आदेशावरून ही आक्रमणे होत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *