-
‘इस्लाम संकटात आहे’ या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या विधानाला विरोध
-
इस्लामी राष्ट्रांच्या मोहिमेच्या विरोधात फ्रेंच नागरिकही संघटित !
इस्लामी कट्टरतावादावर टीका केल्यानंतर इस्लामी देश संघटित होऊन त्याचा विरोध करतात; मात्र हिंदूंवर जेव्हा जगभरातून नाहक टीका होते, तेव्हा भारतातील कोणतेही सरकार त्याचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !
पॅरिस (फ्रान्स) : फ्रान्समध्ये मुसलमान कट्टरतावाद्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्याचा विरोध करण्यासाठी इस्लामी देशांमधून ‘#BoycottFrenchProducts’ अशा हॅशटॅगद्वारे ट्रेंड करण्यात येत आहे. यामुळे अनेक इस्लामी देशांमध्ये फ्रान्सच्या उत्पादनांची विक्री होत नसल्याचे दिसून आले आहे.
१. काही दिवसांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ‘इस्लाम संकटात आहे’, असे म्हटले होते. त्याला विरोध झाला होता. आता फ्रान्समध्ये एका शिक्षकाने ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकामधील महंमद पैगंबर यांची प्रसिद्ध झालेली व्यंगचित्रे वर्गात दाखवल्यावरून धर्मांधाने त्यांचा शिरच्छेद केला होता. त्यानंतर पॅरिसमधील एक मशीद बंद करण्यासाठी इस्लामी संघटनांवर कारवाई करण्यात आरंभ करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर इस्लामी देशांकडून फ्रान्सला वरील प्रकारे विरोध चालू झाला आहे.
३. दुसरीकडे फ्रान्स सरकारच्या बाजूनेही लोकांचे समर्थन मिळत आहे. त्यासाठी #WeSupportFrance हा हॅशटॅगही सध्या ट्रेंड होत आहे. ‘आतंकवादाच्या विरोधात लढण्यात काय अयोग्य आहे?’, ‘बहिष्कार का करायचा ?’, असे प्रश्नही या हॅशटॅगसमवेत विचारले जात आहेत.
आम्ही कधीही पराभव स्वीकारणार नाही ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन
या विरोधावर मॅक्रॉन यांनी म्हटले, ‘आम्ही कधीही पराभव स्वीकारणार नाही. आम्ही शांततेसह सर्व मतभेदांचा सन्मान करतो. मानवी प्रतिष्ठा आणि सार्वभौमिक मूल्यांचा कायम पुरस्कार करणार आहोत.’
इस्लामी देशांकडून जाहीररित्या फ्रान्सचा विरोध
१. अनेक इस्लामी देशांनी फ्रान्सचा जाहीररित्या विरोध केला आहे. त्यांनी औपचारिकपणे पत्र पाठवले आहे. ‘मॅक्रॉन यांनी इस्लामविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यातील असहिष्णुता आणि द्वेष दिसून आला आहे. फ्रान्ससारख्या देशाच्या प्रमुखांसाठी हे लज्जास्पद आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. येमेनमधील मानवाधिकार कार्यकर्ते आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते तवाक्कोल कामरान यांनीही पत्र पाठवले आहे. काही अरब देशांमधील मोठ्या सुपरमार्केट्समधून फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
२. तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तैय्यप एर्दोआन यांनी मॅक्रॉन यांच्यावर टीका करतांना म्हटले, ‘ज्या देशाचा प्रमुख धार्मिक स्वातंत्र्य समजू शकत नाही आणि दुसर्या धर्माचे आचारण करणार्या लाखो नागरिकांसमवेत दुजाभाव करतात, त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाचे मानसिक आरोग्य तपासण्याची आवश्यकता आहे.’
३. मॅक्रॉन यांच्यावर तुर्कस्तानने केलेल्या टीकेनंतर ‘चर्चेनंतर तुर्कस्तानसमवेत राजकीय संबंध संपुष्टात आणायचे कि फ्रान्सच्या राजदुतांना कायमस्वरूपी माघारी बोलवायचे यावर निर्णय घेण्यात येणार आहे’, असे फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले आहे. (अशी कणखर भूमिका घेणार्या फ्रान्सकडून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात