नवी देहली : पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकरमधील नगरपरकर येथील सिंहवाहिनी श्री दुर्गादेवीची धर्मांधांकडून मूर्तीची तोडफोड करण्यात आली. पाकमधील डॉ. रेखा माहेश्वरी यांनी याची माहिती देत तोडफोड केलेल्या मूर्तीचे छायाचित्र ट्वीट केले. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘आम्ही शांतेतेने नवरात्री साजरी करतो; मात काही धर्मांधांना हे आवडत नाही. त्यांनी नगरपरकर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली. पाकिस्तान सर्वांचा आहे आणि ते तुम्हाला स्वीकारवे लागेल. अशा घटना थांबल्या पाहिजेत. अशा घटना आमच्या भावना दुखावत आहेत.’
१. कराचीचे माजी महापौर आरिफ अजाकिया यांनी हे ट्वीट रिट्वीट करत लिहिले की, भारतातील एक मशीद पाडण्यात आल्यावर धर्मनिरपेक्षतावादी नक्राश्रू ढाळतात आणि पाकमधील सहस्रो मंदिरे पाडण्यात आल्यावर मात्र शांत रहातात.
२. सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष साहाय्यक पूंजो भील यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत म्हटले की, याविषयी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांशी बोलणे झाले आहे.
३. यापूर्वी सिंधच्याच बदीन जिल्ह्यातील कडियू घनौर शहरामध्ये १० ऑक्टोबरला एका हिंदु मंदिरामध्ये तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद इस्माइल शैदी याला अटक केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात