Menu Close

चित्रपटात क्रांतीकारक कोमाराम भीम यांना इस्लामी गोल टोपी घातल्याचे दाखवल्याने राष्ट्रप्रेमींचा विरोध

निजाम आणि इंग्रज यांच्याशी लढणारे वनवासी योद्धे कोमाराम भीम यांच्यावर आगामी चित्रपट ‘आर आर आर’ !

हिंदूंच्या योद्ध्यांना मुसलमान दाखवण्याचा हा प्रयत्न संतापजनकच होय ! हिंदूंच्याच देशात हिंदूंकडून हिंदूंच्या आदर्शांचा अशा प्रकारे अवमान करणे लज्जास्पद आहे. याविरोधात केंद्र सरकारने हस्तक्षेप करत केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाला असे प्रसंग काढून टाकण्याचा आदेश दिला पाहिजे !

नवी देहली : आगामी तेलुगू चित्रपट ‘आर आर आर’ यामध्ये निजाम आणि इंग्रज यांच्या विरोधात लढणारे आदिवासी योद्धे कोमाराम भीम यांच्यावर आधारित आहे. (मुळात आदिवासी हा शब्द ब्रिटिशांनी वर्ष १९३० मध्ये अस्तित्वात आणला. ‘आदिवासी’ हे मूळ हिंदूच असून ते वनात रहात असल्यामुळे त्यांचा ‘वनवासी’ असा उल्लेख केला जातो.) या चित्रपटात वनवासी असलेले कोमाराम भीम यांना मुसलमानी गोल टोपी घालून त्यांना मुसलमान दाखवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस्.एस्. राजमौली यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. कोमाराम भीम यांनी ‘जल, जंगल आणि जमीन’ अशी घोेषणा देत निजाम आणि त्याच्या सैन्याच्या विरोधात लढा दिला होता.

१. तेलंगाणामधील आदिलाबाद जिल्ह्यातील उदनूर येथे कोमाराम भीम यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. वनवासी युवकांनी या चित्रपटातील कोमाराम यांना मुसलमान टोपी घातल्याचे दाखवल्यावरून संताप व्यक्त केला आहे. ‘चित्रपटात कोमाराम भीम यांनी इस्लामी टोपी घातल्याचा प्रसंग हटवण्यात आला नाही, तर ते आंदोलन करू’, अशी त्यांनी चेतावणी दिली आहे.

२. सामाजिक माध्यमांतूनही याला विरोध होत आहे. ‘ट्रू इंडोलॉजी’ या ट्विटर वापरकर्त्याने म्हटले, ‘कोमाराम भीम याच्या मुलीचे निजामच्या तालुकदार अब्दुल सत्तार याने अपहरण करून तिचे धर्मांतर केले होते. ४०० कोटी रुपये खर्च करून बनवण्यात येणार्‍या या चित्रपटात खोटे प्रसंग का दाखवण्यात येत आहेत ?’, असा प्रश्‍न विचारला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *