मराठी संगीत वाहिनी ‘झी वाजवा’च्या विज्ञापनाचे झी युवा वाहिनीवरून प्रसारण
- ‘केंद्र सरकार हिंदूंच्या देवतांचा सातत्याने होणारा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा कधी करणार ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होत आहे !
- हिंदूंनी अशा वाहिन्यांवर बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !
मुंबई : ‘झी’ वाहिनी समुहापैकी एक असणार्या ‘झी वाजवा’ या मराठी संगीत वाहिनीचा प्रसार केला जात आहे. याविषयीचे विज्ञापन ‘झी युवा’ या मराठी वाहिनीवरून प्रसारित करण्यात आले. यात कीर्तनाचा अवमान करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये काही कीर्तनकार देवतेच्या समोर कीर्तन करत आहेत. त्यांच्या समोर युवक आणि युवती कीर्तन ऐकत बसले आहेत. त्या वेळी त्यांना कंटाळा येत आहे. त्याच वेळी एक तरुणी एका तरुणाला इशाराला करून आकर्षित करून घेते. नंतर ही तरुणी कीर्तनकारांमध्ये सहभागी होऊन कीर्तनाचे बोल प्रेमप्रसंगांना जोडून ती गुणगुणत रहाते. या दोघांचे प्रेम पाहून कीर्तनाला उपस्थित सर्वजण कीर्तनाच्या बोलांवर नाचू लागतात. अशा प्रकारे कीर्तनाचा अवमान करण्यात आला आहे.
या अवमानाचा हिंदु धर्माभिमानी खालील संपर्कावर ‘झी वाजवा’ आणि ‘झी युवा’ या दोन्ही वाहिन्यांकडे वैध मार्गाने विरोध नोंदवत आहेत.
झी वाजवा फेसबूक : facebook.com/zeevajava/
झी युवा फेसबूक : facebook.com/ZeeYuva/
ट्विटर : @zeeyuva
संयत मार्गाने निषेध करा !
निषेधामागचा मुख्य उद्देश वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कुणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्याला चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा दृष्टीकोन निषेधामागे हवा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात