-
पोलिसांचा लाठीमार आणि नंतर गोळीबार
-
समाजकंटकांकडून गोळीबार झाल्याचा पोलिसांचा दावा
- नेहमी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्याच वेळी हिंसाचार कसा होतो ? अन्य धर्मियांच्या, विशेषतः मोहर्रमच्या मिरवणुकीच्या वेळी असा हिंसाचार झाल्याचे कधी ऐकिवात का येत नाही ?
- बिहारमध्ये भाजपचे युती सरकार असतांना अशा प्रकारचा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
मुंगेर (बिहार) : येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी झालेल्या वादातून पोलिसांनी भाविकांवर लाठीमार केला. त्यामुळे दोघांमध्ये झटापट होऊन त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.
पोलिसांनी दावा केला आहे की, विसर्जनाच्या वेळी काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांना संरक्षणार्थ लाठीमार आणि नंतर गोळीबार करावा लागला. या हिंसाचारात २० पोलीस घायाळ झाल्याचा, तर समाजकंटकांच्या गोळीबारात एक तरुण ठार झाल्याचाही दावा पोलिसांनी केला. सध्या येथे तणाव असून पोलिसांनी अधिक बंदोबस्त ठेवला आहे. या प्रकरणी १०० हून अधिक जणांना कह्यात घेण्यात आले आहे. तसेच ३ गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले. समाजकंटकांकडून १२ गोळ्या झाडण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात