‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने सौदी अरेबियाची भारतद्वेषी कृती !
-
भारताकडून निषेध
-
परिषदेवर बहिष्कार घालण्याची शक्यता
निवळ निषेध नोंदवून आणि बहिष्कार टाकणे पुरेसे नसून सौदी अरेबियाला जी भाषा समजते, त्या भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !
नवी देहली : सौदी अरेबियात होणार्या ‘जी २०’ देशांच्या परिषदेच्या निमित्ताने सौदी अरेबियाने मानचित्र (नकाशा) प्रसिद्ध केला आहे. त्यात भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हा प्रदेश वगळला आहे. याविषयी भारताने कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. ‘सौदी अरेबियाने मानचित्रामध्ये पालट केला नाही, तर भारत पुढील मासामध्ये होणार्या ‘जी २०’ परिषदेला उपस्थित रहाण्याची शक्यता अल्प आहे’, असेही भारताकडून सांगण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
‘जी २०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने २० रियालची (सौदीतील चलन) नवीन नोट जारी केली आहे. यामध्ये एका बाजूला सौदीचे राजे सलमान आणि ‘जी २०’ सौदी परिषदेचा लोगो छापण्यात आला आहे. दुसर्या बाजूला जागतिक मानचित्र छापून ‘जी २०’ मध्ये कोणते देश आहेत हे दर्शवण्यात आले आहे. या मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर हे स्वतंत्र प्रदेश दाखवण्यात आले आहेत. यात पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानचा प्रदेशही दाखवण्यात आलेला नाही.
‘जी २०’ मध्ये असलेले देश
अर्जेंटिना, ब्राझिल, मेक्सिको, कॅनडा, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, युनायटेड किंग्डम, युरोपीय युनियन, रशिया, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, भारत, इंडोनेशिया, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, चीन आणि ऑस्ट्रेलिया
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात