Menu Close

तमिळनाडूमधील सरकारीकरण झालेल्या शिवमंदिराची ३५ एकर भूमी अधिग्रहित करण्याचे अण्णाद्रमुक सरकारचे षड्यंत्र

हिंदु मुन्नानीचा प्रखर विरोध

  • वक्फ बोर्डाची भूमी अधिग्रहित करण्याचे धाडस देशातील एकतरी सरकार दाखवू शकते का ? ज्या अण्णाद्रमुक पक्षाने शंकराचार्य यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्याचे दुःसाहस केले, त्याच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार ?
  • हिंदू सहिष्णु असल्याने त्यांच्या मंदिरांवर मोगलांपासून आणि आताच्या सर्वपक्षीय सरकारांपर्यंत सर्वांनी घाला घातला आहे, हे लक्षात घ्या आणि ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

चेन्नई (तमिळनाडू) : कल्लाकुरिची जिल्ह्यातील  वीरा चोलपूरम् येथील श्री अर्द्धनारीश्‍वर मंदिराची स्थिती अत्यंत बिकट असतांना सरकारच्या हिंदु धार्मिक आणि धर्मार्थ व्यवस्थापन विभागाने मंदिराच्या भूमीची विक्री करण्याचे विज्ञापन वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु मुन्नानी हिने हा आरोप केला आहे. सरकार या मंदिराची ३५ एकर भूमी कल्लाकुरि जिल्ह्यात नवीन जिल्हा मुख्यालय उभारण्यासाठी अधिकग्रहित करू इच्छित आहे. सरकारने या प्रस्तावावर हरकती मागवल्या आहेत. त्यानुसार या संघटनेने या अधिग्रहणाला विरोध दर्शवत सरकारला निवेदन दिले आहे.

हिंदु मुन्नानीचे राज्य सचिव टी. मनोहरन् यांनी म्हटले की, या विज्ञापनानुसार  शिवमंदिराची मालकी असलेल्या ३५ एकर भूमीचे मूल्य १ कोटी ९८ लाख रुपये ठरवण्यात आले आहे. सरकारच्या दिशानिर्देशानुसार ३५ एकर भूमीचे मूल्य १०० कोटी रुपये असले पाहिजे. ते केवळ १ कोटी ९८ लाख रुपये सांगणे ही फसवणूक आणि लूटमार आहे. ज्यांनी या सरकारी मंदिर व्यवस्थापन समितीला कार्य करण्यास आतापर्यंत समर्थन दिले होते, त्या  भाविकांचा हा विश्‍वासघात आहे, तसेच या ठिकाणी बांधकाम करणे अवैध आणि निंदनीय आहे.

हिंदु मुन्नानीने हिंदूंना आवाहन केले आहे की, प्राचीन मंदिराची भूमी विकण्याच्या सरकारच्या प्रयत्नाचा विरोध करावा.

धर्माभिमानी हिंदूंचा ट्विटर ट्रेंडद्वारे विरोध

२९ ऑक्टोबरला सकाळी धर्माभिमानी हिंदूंनी याविरोधात  #TN_Govt_Looting_Temples हा हॅशटॅग ट्रेंड केला. तो काही काळातच राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ४ थ्या क्रमांकावर होता आणि त्यावर २५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी ट्वीट्स करत विरोध दर्शवला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *