पोलिसांनी डिजे असणारी गाडी जप्त केल्याने जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक
- हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर नेहमीच बंधने घालणारे पोलीस अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांच्या वेळी शेपूट घालतात ! बंधने घातल्यावर जमावाने विरोध केल्यास त्यांच्यावर लाठीमार केला जातो आणि त्यात अधिकारी धर्मांध असेल, तर त्याला अधिकच चेव येतो, असे दिसून येते !
- काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ? या घटनेचे सत्य समोर येईल, अशी अपेक्षाच नको !
बिलासपूर (छत्तीसगड) : येथे २७ ऑक्टोबरच्या रात्री तेलीपारा दुर्गोत्सव समितीची मिरवणूक शहर पोलीस ठाण्याजवळून जात असतांना पोलिसांनी डीजे लावल्याचे कारण सांगत ‘डीजे’ असणारी गाडी जप्त केली. तसेच देवीची मूर्ती असणारी गाडीही त्यांनी थांबवून ठेवली. याविषयी समितीच्या सदस्यांनी पोलिसांना विनंती करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी त्याला दाद दिली नाही. यामुळे नंतर वाद झाला आणि कुणीतरी पोलीस ठाण्यावर दगडफेक चालू केली. यामुळे कलीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी भक्तांवर लाठीमार केला. त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी चालू केली. यानंतर पोलिसांनी अतिरक्त पोलीस दल तैनात करून मूर्तीचे विसर्जन केले.
पोलीस निरीक्षक कलीम खान यांनी म्हटले, ‘जमाव पोलीस ठाण्यात घुसल्याने त्यांना हाकलून लावण्यासाठी लाठीमार करावा लागला. याचा व्हिडिओही आहे.’ पोलीस अधीक्षक उमेश कश्यप यांनी म्हटले की, पोलीस ठाण्यात घुसणार्यांवर कारवाई केली जाईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात