मुंबई : ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. मला विचाराल, तर या चित्रपटावर बंदी घालणे सध्या योग्य ठरणार नाही; कारण याचा केवळ ट्रेलर प्रसारित झाला आहे. चित्रपट पहाणे शेष आहे; मात्र लक्ष्मी नावानंतर ‘बॉम्ब’ शब्द जोडणे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. तुम्ही कधी चित्रपटाचे नाव ‘अल्ला बॉम्ब’ किंवा ‘जिझस बॉम्ब’ ठेवू शकत का ? नाही ना ? मग ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव कसे ठेवता ? असे प्रश्न प्रसिद्ध ‘महाभारत’ मालिकेमध्ये पितामह भीष्मची भूमिका साकारणारे, तसेच ‘शक्तीमान’ मालिकेतील ‘शक्तीमान’ ही लोकप्रिय भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी विचारला आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, असे धाडस लोक यासाठीच करतात की, त्यांना ठाऊक आहे की, यामुळे आरडाओरड होईल आणि लोक काही काळानंतर गप्प होतील. या काळात चित्रपटाची प्रसिद्ध होईल. हे असे होत राहील; मात्र जनता हे रोखू शकते.
मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, व्यावसायिक लोकांमध्ये हिंदूंविषयी कुठेही भीती नाही. ते त्यांना सहिष्णु समजतात. ते त्यांना ‘सॉफ्ट टार्गेट’ समजतात. त्यांना ठाऊक आहे की, अन्य कुठल्याही धर्माचा अशा प्रकारे अवमान केला, तर तलवारी काढल्या जातील. यासाठी त्यांच्या धर्मांची नावे चित्रपटाच्या शीर्षकाला दिली जात नाही. मी ४० वर्षांच्या अनुभवातून सांगतो की, चित्रपट निर्माते चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे प्रयोग करत असतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात