Menu Close

मागील २२ वर्षांत महाराष्ट्रातील देशी गायी आणि बैल यांच्या संख्येत ४० टक्के इतकी घट

गोवंश हत्याबंदी कायद्यानंतरही महाराष्ट्रात गोवंशियांच्या संख्येत झपाट्याने घट

‘गोब्राह्मणप्रतिपालक’ अशी ओळख असलेल्या शिवरायांच्या जन्मभूमीत गोमाता आणि गोवंश यांची हत्या रोखण्यात येणारे अपयश सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद !

मुंबई : मागील २२ वर्षांत महाराष्ट्रातील देशी गायी आणि बैल यांच्या संख्येत ४० टक्क्यांनी घट झाली आहे. ही संख्या १ कोटी ५६ लाख वरून ९३ लाख ८५ सहस्र इथपर्यंत घटली आहे. विशेष म्हणजे वर्ष २०१५ मध्ये महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा झाल्यानंतरही येथील देशी बैलांच्या संख्येत २९ टक्के इतकी घट झाली आहे. हा अभ्यास मुंबईतील अभ्यासक डॉ. अब्दुल समद यांनी मांडला आहे.

डॉ. अब्दुल समद यांच्या अभ्यासानुसार, राज्यातील देशी गायींची संख्या न्यून होत असतांना संकरीत गायींची संख्या वाढत आहे. मागील २२ वर्षांपूर्वी राज्यात १८ लाख ७९ सहस्र इतकी असलेली संकरीत गायींची संख्या वर्ष २०१९ मध्ये ४३ लाख ५३ सहस्र इतकी वाढली आहे. यामध्ये ‘अधिक दूध देणार्‍या संकरीत गायी जगवायच्या आणि अल्प दूध देणार्‍या देशी गायींची हत्या करायची’, हे अर्थकारण आहे. वर्ष २०१२ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्रातील देशी बैल २९.६ टक्के, गायी ८.७ टक्के, तर संकरीत बैल ५७.७ टक्के इतके प्रमाण घटले आहे. राज्यात वर्ष १९९७ मध्ये देशी बैल आणि गायी यांचे प्रमाण १२९:१०० असे होते. वर्ष २०१९ मध्ये हे प्रमाण १०३:१०० असे झाले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *