हरियाणातील बल्लभगडमधील अग्रवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर हिंदु तरुणी निकिता तोमर हिची तौसिफ याने गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर धर्मांधांच्या विरोधात वातावरण पुन्हा तापले आहे. या घटनेतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तौसिफ हा काँग्रेसचे आमदार आफताब आलम यांचा नातेवाईक आहे. निकिता तोमर हिला गोळ्या घातल्यानंतर तौसिफ याला नूह येथून अटक करण्यात आली. नूह हा आलम यांचा मतदारसंघ आहे. मागील २ वर्षे तौसिफ निकिता हिला त्रास देत होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती; मात्र तौसिफला असलेल्या राजकीय पाठबळामुळे भयभीत झालेल्या तोमर कुटुंबियांनी पंचायतीच्या साक्षीने तडजोड केली होती. ‘तीच तडजोड त्यांना भोवली’, असेच म्हणावे लागेल. २ वर्षांपूर्वी पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावून तौसिफ याला गजाआड केले असते तर ? किंवा ‘लव्ह जिहाद’चा कायदा अस्तित्वात असता तर ? आज निकिता तोमर जिवंत असती. निकिता तोमर हिच्या हत्येस उत्तरदायी कोण ? ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्यांनी याचे उत्तर द्यायला हवे. तौसिफ याला निकिताशी ‘निकाह’ करायचा होता. त्यासाठी तिचे धर्मांतर करायचे होते. याला विरोध केल्याने निकिताला प्राण गमवावे लागले. या प्रकरणाविषयी काँग्रेसने नेहमीप्रमाणे राजकारण करत राज्यातील भाजप सरकारवर टीका केली आहे; मात्र तौसिफला आलम यांच्यामुळे मिळालेल्या राजकीय पाठबळाविषयी हेतूपुरस्सर मौन बाळगले आहे. भारतातील महिलांच्या हत्या किंवा लैंगिक अत्याचार यांविषयीची प्रकरणे पहाता जेथे हिंदूंची अपकीर्ती करण्यास वाव आहे,
अशीच प्रकरणे काही ठराविक प्रसारमाध्यमे अथवा पुरो(अधो)गामी मंडळी हाताळतांना दिसतात. अशा प्रकरणांना प्रसिद्ध देतांना ही प्रकरणे कोणत्या राज्यात घडली, यालाही महत्त्व असते. याचे उदाहरण म्हणजे केरळमध्ये एका महिलेच्या २ मुलींचे लैंगिक शोषण करून हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे आरोपी माकपचे कार्यकर्ते आहेत. हे प्रकरण ३ वर्षांपूर्वी घडले होते. न्याय मिळत नसल्यामुळे या मुलींच्या आईने आंदोलन पुकारले आहे. सध्या स्त्रीमुक्ती किंवा स्त्रियांवरील अत्याचार ही प्रकरणे मोठ्या प्रमाणात हाताळणार्या प्रसिद्धीमाध्यमांना हे प्रकरण दिसले नाही का ? किंवा यात ‘ब्रेकिंग न्यूज’ वाटली नाही का ? हे प्रकरण ज्या केरळमध्ये घडले तेथे माकपचे सरकार आहे. त्यामुळे पुरोगामी, निधर्मीवादी आणि स्त्रीवादी गप्प आहेत. हेच प्रकरण जर भाजप सत्तेवर असलेल्या राज्यांत घडले असते, तर ते वेगळ्या प्रकारे हाताळले गेले असते. मुख्य प्रश्न हा आहे की, आणखी किती हिंदु मुलींचा बळी गेल्यावर लव्ह जिहाद्यांच्या विरोधात कारवाई होणार आहे ? पूर्वी इस्लामी आक्रमकांनी हिंदु महिलांना बाटवले. त्यांचे वंशज आजही भारतात मोकाट फिरत आहेत. लव्ह जिहादपासून रक्षण करण्यासाठी हिंदूंनी मुलींना धर्मशिक्षण दिले पाहिजे, हे जरी खरे असले, तरी अशांवर कायद्याद्वारेही चाप बसणे आवश्यक आहे. केंद्र सरकार त्याविषयी कधी पावले उचलणार ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात