हिंदूंनो, अशा प्रकारच्या बातम्यांवर प्रसारमाध्यमे कधी चर्चासत्रे घेत नाहीत, हे लक्षात घ्या !
काम न करणार्या मुलींना मारहाण
वसई : येथील हॅण्डमेड्स ऑफ द ब्लेस्ड ट्रीनिटी रोझा मिस्टीका कॉन्हव्हेंट या बालगृहाच्या २ सिस्टर्सविरोधात अल्पवयीन मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे; मात्र बालगृहाच्या चालकांनी हे आरोप फेटाळून लावले असून बालगृहाला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. या बालगृहात मुंबईसह विविध भागांतील अल्पवयीन शाळकरी मुली रहातात.
१. या बालगृहात मुलींना सिस्टर्स मारहाण करतात, तसेच शिळे आणि नासलेले अन्न देतात, अशी तक्रार सीमा क्रियाडो या महिलेने केली आहे.
२. क्रियाडो यांच्या अलायसा (वय ५ वर्षे) आणि ट्रिझिया (वय १५ वर्षे) या मुली गेल्या दोन वर्षांपासून आश्रमात रहात आहेत. माझ्या मुलींना सिस्टरचे कपडे धुणे, भांडी घासणे, बंगले स्वच्छ करणे आदी कामे करायला लावली जात. मुलींनी काम करण्यास नकार दिला, तर त्यांना चपलेने मारहाण करून त्यांचे केस ओढले जातात, असे क्रियाडो यांनी तक्रारीत म्हटले आहे.
३. सीमा क्रियाडो ऑक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१६ या कालावधीत बालगृहातील मुलींना इंग्रजी शिकवण्यासाठी येत होत्या. त्या वेळी बिहार आणि ओरिसा येथून १२ मुलींना नन बनवण्यासाठी आणले होते. त्यांनाही कचरा काढणे, शौचालय स्वच्छ करणे आदी कामे करण्यास भाग पाडले जायचे. कामे केली नाहीत, तर मारहाण केली जायची, अशीही माहिती क्रियाडो यांनी पोलिसांना दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात