Menu Close

फ्रान्स पाठोपाठ रशियामध्येही १६ वर्षांच्या धर्मांध मुलाकडून पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण

पोलिसांच्या गोळीबारात धर्मांध मुलगा ठार

  • केवळ जिहाद्यांना ठार करून हा आतंकवाद संपणार नाही, तर त्याला मुळासकट नष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर आता प्रयत्न करणे आवश्यक आहेत !
  • आता जगभरातील धर्मांधांकडून अशा प्रकारे चाकूद्वारे आक्रमण करण्याचा प्रकार वाढीस लागेल. भारतातील धर्मांधांची संख्या पहाता हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे !

मॉस्को (रशिया) : फ्रान्सच्या नीस शहरात झालेल्या जिहादी आक्रमणाप्रमाणेच रशियाच्या मुसलमानबहुल असलेल्या कुकमोर शहरात एका १६ वर्षांच्या धर्मांध मुलाने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत आणि पोलिसांना ‘काफीर’ म्हणत एका पोलिसावर ३ वेळा चाकूने वार केले.

तपास करणार्‍यांच्या म्हणण्यानुसार, विटाली अँटीपॉव्ह यांनी शुक्रवारी पूर्व रशियाच्या कुकमोर शहरात पोलिस स्टेशनला आग लावण्याचा प्रयत्न केला होता.

या वेळी जवळच असलेल्या दुसर्‍या एका पोलिसाने या मुलावर गोळी झाडून त्याला ठार केले. या धर्मांध मुलाकडे चाकू आणि पेट्रोल बॉम्ब होता. तो येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीला आग लावण्यासाठी आला होता. ‘आग लावण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने हे आक्रमण केले’, असे पोलिसांनी सांगितले. या धर्मांधाचे नाव विटले अंतीपोव असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटले आहे. पोलीस या आक्रमणाशी संबंधित आणखी दोघांचा शोध घेत आहेत. अंतीपोव हा सायबेरियाच्या अल्टाई भागत रहातो आणि हलाल मांसाच्या हॉटेलमध्ये काम करतो. या हॉटेलच्या मालकानेही यापूर्वी अवैध शस्त्र बनवणे आणि तोडफोड करणे या प्रकरणी १४ वर्षांची शिक्षा भोगलेली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *