अशा पोलिसांवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
मुंगेर (बिहार) : येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. हा गोळीबार समाजकंटकांकडून करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता, तर हिंदूंनी हा गोळीबार पोलिसांनीच केल्याचा दावा केला होता. या घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असणार्या सी.आय.एस्.एफ्.च्या सैनिकांनी दिलेल्या अहवालात, ‘पोलिसांकडूनच हा गोळीबार करण्यात आला आणि त्या वेळी पोलिसांकडून मोठी चूक झाली आहे’, असे म्हटले आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांचे स्थानांतर केले आहे. या गोळीबारामुळे संतापलेल्या जमावाने घटनेच्या ३ दिवसानंतर येथील एका पोलीस ठाण्याला आग लावल्याची घटनाही घडली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात