Menu Close

हिंदूंच्या विरोधानंतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव पालटले

चित्रपटात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याविषयी मात्र मौन

चित्रपटात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्याविषयीची भूमिकाही निर्मात्यांनी घोषित करावी अन्यथा हिंदू चित्रपटावर बहिष्कार घातल्याविना रहाणार नाहीत !

मुंबई : शबीना खान आणि तुषार कपूर निर्मित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे आक्षेपार्ह नाव पालटण्यात येणार आहे. चित्रपटाचे व्यापार विश्‍लेषक तरण आदर्श यांनी ‘ट्वीट’ करून याविषयीची माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या नावातील ‘बॉम्ब’ हा शब्द काढून केवळ ‘लक्ष्मी’ असे चित्रपटाचे नाव करण्यात आले आहे. ज्या तमिळी चित्रपटाच्या कथानकावरून हा चित्रपट करण्यात आला आहे, त्यामध्ये अभिनेता मुसलमान नाही. असे असतांना ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटात जाणीवपूर्वक अभिनेता मुसलमान आणि अभिनेत्री ब्राह्मण दाखवून एकप्रकारे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे. याविषयीही हिंदूंनी आक्षेप घेतला होता; मात्र त्यावर चित्रपट निर्मात्यांकडून अद्यापही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

येत्या ९ नोव्हेंबर या दिवशी हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे. हिंदूंची आराध्यदेवता श्री लक्ष्मीदेवीच्या नावाने ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे आक्षेपार्ह आणि अवमानकारक नाव ठेवून हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी या नावाला सामाजिक माध्यमांद्वारे हिंदूंनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला होता. हे लक्षात घेऊन या चित्रपटाचे नाव पालटण्यात आले आहे.

चित्रपटात हिंदूंच्या देवतांना शक्तीहीन दाखवण्याचा प्रयत्न

‘या चित्रपटात मुसलमान व्यक्तीरेखा असलेल्या अभिनेत्याच्या शरिरात एका तृतीयपंथियाचे भूत संचारलेले दाखवण्यात आले आहे. ज्या वेळी हे भूत कुटुंबातील व्यक्तींना त्रास देण्यासाठी जाते, तेव्हा कुटुंबातील व्यक्ती हिंदूंच्या विविध देवतांची चित्रे पुढे करतात; मात्र भूत त्याला जुमानत नाही’, असे चित्रपटाच्या अधिकृत ‘ट्रेलर’मध्ये दाखवण्यात आले आहे. यातून हिंदूंच्या देवतांना एकप्रकारे शक्तीहीन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी अशा प्रकारचे दृश्य दाखवण्याचे धाडस चित्रपट निर्मात्यानी केले असते का ? – संपादक)

केवळ ‘लक्ष्मी बॉम्ब’मधील ‘बॉम्ब’ शब्द वगळणे पुरेसे नसून चित्रपटाचे पूर्ण नाव पालटेपर्यंत समितीचा लढा चालू राहील ! – श्री. सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या नावामुळे श्री लक्ष्मीचे विडंबन होत असल्याने हिंदु जनजागृती समितीने त्याविरोधात मोहीम आरंभली होती, तसेच याविषयी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला निवेदनही दिले होते. हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होऊन वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच चित्रपटाचे नाव पालटण्यात आले; मात्र एवढे पुरेसे नाही. चित्रपटाला असलेले ‘लक्ष्मी’ हे नाव तसेच ठेवले आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असल्यामुळे चित्रपटाचे पूर्ण नाव पालटणे आवश्यक आहे. या मागणीसह चित्रपटात मुसलमान नायक आणि हिंदु नायिका दाखवून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे. हा भाग वगळण्याची समितीची मागणी कायम असून ते पालटेपर्यंत समितीचा लढा चालू राहील !

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *