‘लक्ष्मी बॉम्ब’ हे आक्षेपार्ह नाव पालटले असले, तरी या चित्रपटातील ‘लव्ह जिहाद’ आणि हिंदूंच्या देवतांविषयी अवमानकारक दृश्ये यांविषयी निर्मात्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळेपर्यंत हिंदूंनी आपल्या मागणीवर ठाम रहावे.
मुंबई : माझ्यासाठी आणि देशातील सर्व जागरूक देशवासियांना एका गोष्टीचा आनंद आहे की, ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे शीर्षक आता ‘लक्ष्मी’ असे पालटण्यात आले आहे. ‘बॉम्ब’ निकामी करण्यात आला आहे. यापुढे कोणताही निर्माता हिंदूंच्या देवदेवतांचा aअवमान करण्याचे धाडस करणार नाही, असे ‘ट्वीट’ ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी केली आहे.
यापूर्वी ‘अल्लाह बॉम्ब’, ‘जीझस बॉम्ब’ असे नाव ठेवण्याचे धाडस चित्रपट निर्माते करतील का ?’, असा प्रश्न उपस्थित करून मुकेश खन्ना यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे आक्षेपार्ह नाव ठेवल्याचा निषेध केला होता. आता चित्रपटाचे नाव पालटण्यात आल्याच्या निर्णयाचे स्वागत करतांना मुकेश खन्ना यांनी वरील ‘ट्वीट’ केले आहे. (विरोधानंतर चित्रपटाचे आक्षेपार्ह नाव पालटणारे मुळातच हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान होईल, असे नाव ठेवण्याचे धाडस का करतात ? याविषयी हिंदूंनीही विचार करण्याची आवश्यकता आहे. – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात