फ्रान्सच्या नीस शहरात झालेल्या जिहादी आक्रमणाप्रमाणेच रशियाच्या मुसलमानबहुल असलेल्या कुक्मोर शहरात एका १६ वर्षांच्या धर्मांध मुलाने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत आणि पोलिसांना ‘काफीर’ म्हणत एका पोलिसावर चाकूने वार केले. हा धर्मांध येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीला आग लावण्यासाठी आला होता. पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने हे आक्रमण केले. हा धर्मांध ज्या हलाल मांसाच्या हॉटेलमध्ये काम करत होता त्या हॉटेलच्या मालकालाही अवैध शस्त्र बनवणे अन् तोडफोड करणे या प्रकरणी १४ वर्षांची शिक्षा झालेली आहे. जगभरात कुठेही जावा, या धर्मांधांचे वागणे हे असे आतंकवादीच असतेे.
इसिसच्या आतंकवाद्यांच्या सिरीयावरील आक्रमणानंतर इस्लामी राष्ट्रांतील अनेक मुसलमान युरोपमध्ये शरणार्थी म्हणून स्थायिक झाले. या वेळी युरोपमधील देशांनी त्यांना सामावून घेतले खरे; पण यांतील काही धर्मांधांची ‘खाल्ल्या मिठाला न जागण्याची’ हीन वृत्ती दिसून आली. या धर्मांधांनी त्यांना आश्रय दिलेल्या देशातील महिलांवरच अत्याचार करायला प्रारंभ केला. तेच धर्मांध आता फ्रान्स, रशिया यांसारख्या देशांत आतकंवादी आक्रमण करायला लागले आहेत. त्यामुळे केवळ युरोपमधील देशांनीच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही अशा धर्मांधांपासून सावध रहाणे आणि त्यांना प्रतिकार करण्यासाठी सर्वतोपरी सिद्ध रहाणे आवश्यक आहे. ‘खाल्ल्या मिठाला न जागणार्या’ धर्मांधांना सामावून घेणे; म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखेच आहे.
धर्मांधांची चिथावणीखोर वक्तव्ये !
फ्रान्स किंवा रशिया या देशांमध्ये झालेल्या या आत्मघातकी आतंकवादी आक्रमणांच्या घटना दिसायला लहान असल्या, तरी येणार्या भीषण काळाची जाणीव करून देणार्या आहेत. नॉस्ट्रेडॅमस या प्रसिद्ध भविष्यवेत्त्याने ख्रिस्ती आणि धर्मांध यांच्यात संघर्ष होणार असल्याचे भाकीत वर्तवले होते. ‘त्याची प्रचीती लवकरच येणार’, अशी चिन्हे दिसत आहेत. याचे कारण असे की, या आतंकवादी आक्रमणानंतर आणि त्याला दिलेल्या प्रत्त्युत्तरानंतर जगभरातील धर्मांधांचे नेते त्यांच्या समाजाला उद्देशून विविध आवाहने करू लागले आहेत. त्याचसमवेत फ्रान्समधील ख्रिस्त्यांनीही ‘इस्लामने युरोपमधून चालते व्हावे’च्या घोषणा दिल्या. मलेशियात पळून गेलेल्या झाकीर नाईकची धमकी, मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर यांचे फ्रान्सच्या लाखो लोकांना मारण्याचा मुसलमानांना पूर्ण अधिकार असल्याचे विधान, हे स्पष्टपणे हिंसा करण्याचे आवाहन आहे. ही चिथावणीखोर विधाने पहाता धर्मांधांची आक्रमणे वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. काळाची ही पावले ओळखून सतर्कता न बाळगल्यास किंवा प्रतिकाराची सिद्धता न केल्यास आत्मघात ओढवून घेतल्यातच जमा, असे समजावे. धर्मांध नेते बोलघेवडे आहेत, असे म्हणून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे सर्वथा चुकीचेच ठरेल. जरी युरोपमध्ये ख्रिस्ती आणि धर्मांध यांच्यात संघर्ष झाला, तरी त्याचे पडसाद भारतात उमटून येथील हिंदूंना त्याची झळ सोसावी लागणार आहे. याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.
भोपाळमधील निदर्शने ही हिंदूंना चेतावणी !
फ्रान्समधील घटनेवरून भोपाळमध्ये मुसलमानांनी सहस्रोंच्या संख्येने एकत्र येत निदर्शने केली. ही निदर्शने बाह्यतः जरी ‘फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधातील आहेत’, असे वाटत असले, तरी ती येथील हिंदूंना चेतावणी आहे. याद्वारे त्यांना हिंदूंना हेच सांगायचे आहे की, ‘फ्रान्समध्ये झाले तसे तुम्ही येथे कराल, तर आम्ही असे जमावाने येऊन तुम्हाला संपवू.’ भोपाळ पोलिसांनी या मुसलमानांवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला; पण आधी या धर्मांधांना एकत्र जमायला का दिले ? या सर्वांना पांगवता आले असते; पण नेहमीप्रमाणे धर्मांधांसमोर नांगी टाकलीच. जेथे १६ ते १८ वर्षांची मुले परिणामांची पर्वा न करता आत्मघातकी आतंकवादी आक्रमण करतात, तेथे कोरोनामुळे होणार्या कारवाईची त्यांना भीती वाटेल का ? प्रशासनाला हे समजण्याची बुद्धी होईल तो सुदिन !
रात्रच नव्हे, तर दिवसही वैर्याचा !
भारतातील हिंदूंना तर यापुढे डोळे उघडे ठेवून झोपावे लागणार आहे. येथे प्रतिदिन धर्मांधांकडून हिंदु मुलींवर बलात्कार, त्यांना ठार मारणे, हिंदुत्वनिष्ठांना ठार मारणे, त्यांच्यावर आक्रमण करणे, अशा घटना चालू असतात. ३० ऑक्टोबरला झालेल्या भाजपच्या ३ कार्यकर्त्यांच्या हत्यांसह जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये गेल्या ६ मासांत भाजपच्या १४ नेत्यांच्या हत्या केल्या आहेत. फ्रान्स किंवा रशिया या देशात एखाद दुसर्याला धर्मांध आतकंवाद्यांनी ठार मारल्यावर त्याची जगभरात मोठी बातमी होते आणि भारतात त्या धर्मांधांना पाठिंबा दर्शवणारी निदर्शने होतात; पण काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदु नेत्यांच्या हत्या होऊनही त्याला भारतातच दुय्यम प्रसिद्धी मिळते. या घटना जागतिक स्तरावर पोचत नाहीत; कारण भारतातील बहुतांश प्रसारमाध्यमांचे मालक आणि संपादक यांच्यामध्ये धर्मांधांच्या विरोधात सत्य बोलण्याचेही धाडस नाही. काश्मीरमध्ये झाले ते आक्रमण राजकीय नाही, तर जिहाद्यांनी वेचून भाजपच्या, म्हणजेच हिंदु नेत्यांना लक्ष्य केल्याने ते धार्मिक आक्रमण आहे. मेहबूबा मुफ्ती, फारुख किंवा ओमर अब्दुल्ला यांना कोणताही आतंकवादी मारणार नाही; कारण ते आतंकवाद्यांना अपेक्षित असे वागतात. ओवैसी म्हणतात, ‘‘काश्मीरमधील मुसलमान हुशार आहेत. ते कोणत्याही गोष्टीचा बदला त्वरित घेत नाहीत. त्यांनी १९८७ मधील घटनेचा बदला १९८९ मध्ये घेतला आणि हिंदूंना तेथून हाकलले.’’ ही हिंदूंना आणि मोदी सरकारला दिलेली धमकी आहे.
भारतातील हिंदू पूर्वीपेक्षा जरा हुशार झाले आहेत; पण ही हुशारी सध्यातरी पहिलीतील मुलाएवढीच आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘आतंकवादाविरुद्धच्या लढाईत भारत फ्रान्ससमवेत आहे’, असे म्हटलेले असतांना भोपाळमध्ये काँग्रेसचा धर्मांध नेता सहस्रो मुसलमानांना फ्रान्सच्या विरोधात एकत्र आणतो. काँग्रेसचे इतर नेतेही फ्रान्सच्या बाजूने बोलत नाहीत. यातून हिंदूंना केवळ धर्मांधांचीच भीती नाही, तर काँग्रेसवाले, लाल बावटावाले साम्यवादी, फुटीरतावादी, खलिस्तानवादी आदी सर्व घरभेद्यांपासूनही धोका आहे, हे त्यांनी ओळखावे. रात्रच नव्हे, तर दिवसही वैर्याचे आहेत. सावधान !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात