Menu Close

फेसबूकवर कथितरित्या इस्लाम आणि महंमद पैगंबर यांचा अवमान करणारी हिंदु तरुणी अचानक बेपत्ता

सदरघाट (बांगलादेश)  येथील घटना !

हिंदु तरुणीला धर्मांधांनीच पळवून नेले असणार यात हिंदूंना शंका असण्याचे कोणतेही कारण नाही. मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये हिंदूंनी काहीही केले नाही, तरी ते ‘हिंदु’ असल्याने त्यांच्यावर आक्रमणे होतात, महिलांवर बलात्कार होतात, मंदिरे पाडली जातात, हे लक्षात घ्या !

सदरघाट (बांगलादेश) : येथील जगन्नाथ विश्‍वविद्यालयात शिकणारी हिंदु तरुणी तिथी सरकार नवरात्रीच्या काळात श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपामध्ये दर्शनाला जात असतांना अचानक बेपत्ता झाली आहे. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. ६ दिवस उलटून गेल्यानंतरही तिचा अद्याप शोध लागलेला नाही.

तिथी हिला काही दिवसांपूर्वी विश्‍वविद्यालयाने निलंबित करून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तिच्यावर आरोप होता की, तिने फेसबूकवर इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्याविरोधात लिखाण केले होते; मात्र येथील हिंदु संघटनांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच तिथी हिने पोलीस ठाण्यात तिचे फेसबूक खाते हॅक करण्यात आल्याची तक्रारही नोंदवली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *