बांगलादेशातील हिंदु विद्यार्थ्यांचा ईशनिंदेच्या नावाखाली होणारा छळ थांबवण्याची हिंदूंची मागणी
- हिंदूंना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांना इस्लामविरोधी ठरवून त्यांना मृत्यूदंडासाठी प्रयत्न करणारे हा नवीन प्रकारचा ‘सायबर जिहाद’च होय !
- भारत सरकारने यात लक्ष घालून बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा !
(सौजन्य : स्ट्रगल फॉर हिंदू एक्सिस्टन्स)
ढाका (बांगलादेश) : मुसलमानबहुल बांगलादेशात कट्टरतावादी धर्मांध आता हिंदु विद्यार्थ्यांना लक्ष्य करत आहेत. हिंदूंना ईशनिंदेच्या गुन्ह्यात अडकवण्याचे षड्यंत्र मुसलमानांकडून रचले जात आहे. त्यामुळे बांगलादेश पोलीस ‘डिजिटल सुरक्षा अधिनियम २०१’च्या अंतर्गत विविध कलमांखाली मोठ्या प्रमाणात हिंदु विद्यार्थ्यांना अटक करत आहेत.
१. या घटना घडवण्यासाठी कट्टरवादी धर्मांध हे हिंदूंची नावे असलेल्या फेसबूक खात्यांना हॅकर्सद्वारे लक्ष्य करतात. हे खाते हॅक करतात आणि त्यानंतर सामाजिक माध्यमांवर याद्वारे इस्लामविरोधात निंदनीय गोष्टी प्रसारित करतात. त्यानंतर अशा टिपण्यांचा ‘स्क्रीनशॉट’ मुसलमान विद्यार्थ्यांना, तसेच कट्टरतावाद्यांना पाठवतात. त्यानंतर विद्यापीठ प्राधिकरण विद्यार्थ्यास निलंबित करते आणि विद्यार्थ्याच्या विरोधात डिजिटल सिक्युरिटी कायद्याच्या अंतर्गत (डी.एस्.ए.मध्ये) गुन्हा नोंद केला जातो. असे अनेक विद्यार्थी पोलीस कोठडीत अथवा न्यायालयीन कोठडीत खितपत पडले आहेत. ईशनिंदेच्या नावाखाली हिंदूंना छळण्याचे धर्मांधांना आणखी एक साधन मिळाले आहे.
२. ईशनिंदेच्या आरोपाच्या नावाखाली अल्पसंख्य हिंदूंना अटक करून त्यांचा छळ करणे बांगलादेशात काही नवीन नाही. असे असले, तरी हिंदूंच्या नवरात्रोत्सवाच्या काळात २ हिंदु विद्यार्थिनी आणि ६ हिंदु विद्यार्थी यांना ऑक्टोबरच्या एकाच मासांत ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक केली गेली जाणे, हा मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे. बांगलादेशी हिंदू सतत भीती आणि सायबर गुंडगिरी यांच्या सावटाखाली राहत आहेत.
या विद्यार्थ्यांचा केला गेला छळ !
१. मिथुन मंडल, वित्त आणि बँकिंग विभागात प्रथम वर्षाचा विद्यार्थी
२. तिथी सरकार, प्राणीशास्त्र विभागाची तृतीय वर्षाची विद्यार्थी
३. प्रतीक मजुमदार, पर्यावरण विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचा विद्यार्थी
४. पाल दिप्तो, फार्मसी विभागाचा विद्यार्थी
५. दीप्ती राणी दास, स्थानिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी
६. मिथुन डे उपाख्य पिकलू नील
‘हिंदु एक्झिस्टन्स फोरम’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने या ६ विद्यार्थ्यांना पोलिसांकडून किंवा बांगलादेशातील न्यायिक कोठडीतू मुक्त करण्याची, तसेच विद्यापिठातील त्यांचे निलंबिन मागे घेण्याची मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात