Menu Close

‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीने लव्ह जिहादच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यावर पोलिसांचे आक्रमण !

 ‘सुदर्शन न्यूज’चे संपादक सुरेश चव्हाणके, पत्रकार आणि महिला यांना धक्काबुक्की

  • असे पोलीस भारताचे कि पाकचे ? राजधानी देहलीत हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी काढलेला मोर्चा पोलीस जर अशा प्रकारे चिरडत असतील, तर हिंदूंचा वाली कोण ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात आल्यास चूक ते काय ?
  • अशा तुघलकी पोलिसांवर केंद्र सरकार कठोर कारवाई करणार का ?

देहली : लव्ह जिहादच्या विरोधात ‘सुदर्शन’ वाहिनीने मोहीम उघडली असून त्याचाच एक भाग म्हणून १ नोव्हेंबर या दिवशी इंडिया गेट’वर मोर्चा आयोजित केला होता. या मोर्च्यात सहभागी झालेले पत्रकार, महिला, मुले यांच्यावर पोलिसांनी आक्रमण केले. एवढेच नव्हे, तर ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनाही धक्काबुक्की केली.

सुदर्शन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार लव्ह जिहाद करणार्‍या धर्मांधांना फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. शांततापूर्ण वातावरणात चालू असलेल्या मोर्च्यावर पोलिसांनी आक्रमण केले. यामुळे मोर्च्याच्या ठिकाणी गोंधळ उडाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *