मुंबई : श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदु परिषदेच्या अंतर्गत बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. गोरेगाव (प.) लिंक रोड येथील आंबामाता मंदिराच्या येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. यामध्ये दुर्गा वाहिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सिंह वाहिनी, दुर्गामाता मंदिर समिती, वीरसेना, पू. आसाराबापू संप्रदाय, पतंजली योग समिती, सनातन संस्था, शिवरत्न प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, स्वराज्य मराठा पथक, व्ही.आर्. मेरीटाईम सर्विस प्रा. लि. आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
क्षणचित्र : या शोभायात्रेत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या आतंकवादविरोध विशेषांकाचे वितरण करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात