- अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये कधी हिंंदूंना त्यांच्या धार्मिक कृती करण्याची अनुमती मिळाली आहे का ? हिंदू तरी अशी अनुमती मागण्याचे धाडस करू शकतात का ?
- हिंदूंच्या सद्गुणविकृतीमुळेच त्यांचा काश्मीरमध्ये वंशविच्छेद झाला आणि देशाचेही दोन तुकडे झाले आहेत. तरीही हिंदूंनी यातून कोणताही बोध घेतलेला नाही !
मथुरा (उत्तरप्रदेश) : येथील नंदगावातील नंद महल मंदिरामध्ये नमाजपठण करतांना २ मुसलमानांचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फैसल खान आणि महंमद चांद अशी त्यांची नावे असून ते ब्रज ८४ कोस यात्रेसाठी सायकलवरून प्रवास करत असतांना या मंदिरात त्यांनी नमाजपठण केले. गांधीवादी कार्यकर्ते नीलेश गुप्ता आणि अलोक रत्ना हेही त्यांच्या समवेत या यात्रेत सहभागी आहेत. हे सर्वजण दुपारी २ वाजता नंदगावात पोचल्यावर दुपारच्या नमाजाची वेळ झाल्याने त्यांनी मंदिरातील पुजार्यांकडे मंदिरात नमाजपठण करण्याची अनुमती मागितली. अनुमती मिळाल्याने त्यांनी येथे नमाजपठण केले, असा दावा त्यांनी केला; तर पुजार्यांनी अनुमती दिली नव्हती, असा दावा केला आहे. पोलिसांनी फैसल खान याला अटक केली आहे.
याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याचा विरोध केला आहे. ‘हे लोक हिंदूंना मशिदीमध्ये आरती करण्यास, घंटा वाजवण्यास अनुमती देऊ शकतील का ?’, असा प्रश्न हिंदुत्वनिष्ठांनी उपस्थित केला आहे. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी मंदिराची शुद्धी करून तेथे होमहवन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात