‘टाइम्स ऑफ इंडिया’ने जिहादी विचार पसरवणार्या किती सामाजिक माध्यमांतील खात्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या आहेत ? हे ते सांगणार आहे का ? या दैनिकाचा इतिहास आणि वर्तमान हिंदुद्वेषीच राहिला आहे. इंग्रजांनी चालू केलेले हे दैनिक आजही त्यांच्याच विचारांची आणि कृतींची री ओढत आहे. अशांवर हिंदूंना बहिष्कार टाकल्यास आश्चर्य वाटू नये !
नवी देहली : नियमांचे उल्लंघन करत असल्याचे सांगत फेसबूककडून ‘लव्ह जिहाद’चा विरोध करणार्या ३ गटांना हटवण्यात आले आहे. याविषयीचे वृत्त इंग्रजी दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. याच दैनिकाकडून या गटांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती.
या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, या गटांकडून आक्षेपार्ह साहित्य प्रसारित केले जात होते. तसेच यातून अश्लीलता आणि भडकाऊ भाषणेही प्रसारित केली जात होती. तसेच आंतरधर्मीय दांपत्यांची ओळख उघड करून त्यांची सुरक्षा धोक्यात आणण्यात येत होती. त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करण्यात येत होत्या. या गटांतून अल्पसंख्यांक समाजावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत होते आणि त्यांच्या विरोधात लोकांना भडकावण्यात येत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात