फ्रान्ससारख्या देशात धर्मांधांनी हिंसाचार घडवून आणल्यावर तो मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलली जातात. भारतात मात्र पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून अशी कठोर पावले उचलतांना दिसत नाही, हे लक्षात घ्या !
पॅरिस (फ्रान्स) : मी मुसलमानांचा सन्मान करतो. मी समजू शकतो की, महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र बनवले गेल्यामुळे ते दुखावले आहेत. असे असले तरीही याची प्रतिक्रिया म्हणून हिंसा सहन केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन फ्रान्सचे राष्टाध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांत पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रांमुळे झालेल्या हिंसाचारावर ते वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मॅक्रॉन म्हणाले की, संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने समजले जात आहे. मी पैगंबर यांच्या व्यंगचित्राचे समर्थन करत नाही.
तरीही देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे संरक्षण केले जाईल. यामध्ये व्यंगचित्र छापणेही अंतर्भूत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात