नवी देहली : भारतात मानवाधिकारांचे तथाकथित उल्लंघन होत असल्याचे सांगत अमेरिकेच्या गृह राज्य विभागाकडून कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे. या विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, भारतातील पोलीस यंत्रणा मनमानी करून अटक करते, असे म्हटले असून देशातील काही घटनांचे संदर्भ देऊन त्यावर टीका करण्यात आली आहे. (स्वतःच्या देशातील वर्णद्वेषाचे वाढते प्रकार रोखण्यासाठी काहीही न करता भारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक खुपसण्यात रस घेणारी अमेरिका ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. या अहवालात ७ एप्रिल या दिवशी झालेल्या संशयित चंदन तस्करांच्या चकमकीचा तसेच २०१५ या वर्षी नालगोंडा येथे ५ नक्षलवाद्यांना कारागृहातून भाग्यनगर येथील न्यायालयात नेत असतांना त्यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेचा समावेश करण्यात आला आहे. (अमेरिकेला नक्षलवाद्यांची चिंता आहे; मात्र गेली ५ दशके नक्षलवादामुळे होरपळणार्या भारतीय जनतेची नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. तसेच भारतात बंदी घालण्यात आलेल्या सिमी संघटनेच्या १४ जणांची खांडवा न्यायालयाने ३० सप्टेंबर या दिवशी निर्दोष असल्याचे सांगत सुटका केली होती. निरपराध्यांना अटक केली जाते, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
३. मध्यप्रदेशात २००१ ते २०१२ या काळात पीपल्स युनियन ऑफ डेमॉक्रॅटिक राईट्स आणि जामिया टीचर्स सॉलिडॅरिटी असोसिएशनने दाखल केलेल्या ७५ खटल्यांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.
४. त्याचप्रमाणे मालेगाव स्फोट प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आक्रमणामध्ये सहभागी असणार्या हिंदूंना मुभा दिली असल्याचा आरोप अमेरिकेच्या गृह राज्य विभागाकडून करण्यात आला आहे. (या प्रकरणात हिंदूंना तत्कालीन काँग्रेसी राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोवले आहे. त्यामुळे त्यांची आतापर्यंत निर्दोष सुटका होणे आवश्यक होते, त्यांना जर कोणती मुभा मिळत असेल, त्यात चुकीचे काय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. या मानवाधिकार अहवालामध्ये मणिपूरमध्ये ४ जून या दिवशी नागा बंडखोरांच्या आक्रमणामध्ये ठार झालेल्या सैन्याच्या २० सैनिकांच्या प्रकरणाचाही समावेश करण्यात आला आहे. यानंतर विशेष सैन्य पथकाने सूड घेण्यासाठी ९ जून या दिवशी म्यानमारच्या भूमीवर ३० ते ७० आतंकवाद्यांना मारण्यात आल्याचा दावा, या अहवालात करण्यात आला आहे. (भारतात आतंकवादी आक्रमणे करणार्यांना भारत ठार करणारच आणि तो भारताचा अधिकार आहे. लादेन याला पाकमध्ये जाऊन ठार करतांना अमेरिकेला मानवाधिकाराची आठवण का नाही झाली ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात