फ्रान्स इस्लामी देशांच्या दबावासमोर न झुकता आतंकवाद्यांवर कारवाई करत आहे, हे कौतुकास्पद ! आतंकवादाच्या विरोधात तात्काळ कृती करणार्या फ्रान्सकडून सर्वच देशांनी शिकणे आवश्यक !
बामाको (माली) : पश्चिम आफ्रिका खंडामधील माली देशाच्या बुर्किना फासो आणि नायगर यांच्यामधील सीमावर्ती भागात फ्रान्सच्या वायूदलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अल कायदाचे ५० हून अधिक आतंकवादी ठार झाले, अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी दिली. या भागात जिहादी बंडखोरांचे वर्चस्व आहे. पार्ली यांनी काही दिवसांपूर्वीच नायजेरियाचे अध्यक्ष मोहमदोऊ इस्सोऊफोऊ आणि संरक्षणमंत्री इस्सोऊफोऊ कातांबे यांची भेट घेतली होती.
१. पार्ली म्हणाल्या की, जहादी आतंकवादी दुचाकीवरून प्रवास करतांना त्यांच्यावर २ मिराज लढाऊ विमानांनी आक्रमण केले. त्या वेळी आतंकवाद्यांनी झाडांखाली लपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विमानांनी क्षेपणास्त्रे डागली. त्यात आतंकवादी ठार झाले. ड्रोनने ३० हून अधिक आतंकवाद्यांच्यावाहनांच्या ताफ्याची छायाचित्रे टिपल्यानंतर एअर स्ट्राईक करण्यात आले.
२. फ्रान्स सैन्याचे प्रवक्ते कर्नल फ्रेडेरिक बार्ब्रे यांनी सांगितले की, या आक्रमणानंतर ४ आतंकवाद्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळून आली. ते या भागातील सैनिकी भागांवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते. सहारा भागात इस्लामिक स्टेटविरोधात कारवाई चालू आहे. ग्रेटर सहारामधील कारवाईत ३ सहस्र सैनिकांचा समावेश आहे. गेल्या एक मासापासून ही कारवाई चालू आहे. त्या कारवाईची माहितीदेखील लवकरच दिली जाईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात