जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठांची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
- अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि सरकारी यंत्रणा यांना हे स्वत:हून लक्षात का येत नाही ?
- ही संघटना कधी मुसलमानांसाठी हिंदूंच्या देवतांची माहिती सांगणार्या निबंध स्पर्धेचे आयोजन करील का ? या स्पर्धेचे आयोजन म्हणजे हिंदूंचे वैचारिक धर्मांतर करण्याचे षड्यंत्र आहे !
जळगाव : जिल्ह्यात वहदत-ए-इस्लामी हिंद, जळगाव या संघटनेकडून ‘प्रेषित हजरत महंमद सल्ल यांचे जीवन एक आदर्श’ या विषयावर खुली निबंध स्पर्धा मुस्लिमेतर समाजासाठी आयोजित केली आहे. सध्या जगात धार्मिक भावनेवरून सर्वत्र संवेदनशील वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात आयोजित केलेली ही स्पर्धा त्वरित रहित करण्यात यावी, अशी मागणी जळगाव येथील देशभक्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गवळी यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, आज आपण विकसित असलेल्या ‘फ्रान्स’ या देशाची अवस्था पहात आहोत. एका चित्रावरून तेथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. युरोपातील ऑस्ट्रिया या देशातही अशीच घटना घडली आहे. संपूर्ण जग या घटनेमुळे अस्थिर आहे. जळगाव जिल्ह्यातही विविध तालुक्यांत फ्रान्सविरोधी आंदोलने होत आहेत. मुसलमानेतर समाजात प्रेषित महंमद यांच्याविषयी असलेल्या अज्ञानातून, तसेच सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून सध्या जे चालू आहे, त्यामुळेही कुणी निबंधामध्ये काही अनुचित लिहिले आणि त्याद्वारे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यास त्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटू शकतात. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणे संवेदनशील आहेत. निबंधातून कुणी चुकीचे लिखाण केले आणि त्याचे पडसाद उमटले, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाला, तर त्याला सर्वस्वी आयोजक आणि प्रशासन उत्तरदायी असेल.
निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहन तिवारी, विश्व हिंदु परिषदेचे श्री. देवेंद्र भावसार, हिंदू महासभेचे श्री. नारायण अग्रवाल आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता निरंजन चौधरी यांच्या स्वाक्षर्या आहेत. या निवेदनावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. निवेदन स्वीकारल्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक गवळी यांनी ‘स्पर्धेच्या आयोजकांना त्वरित संपर्क करून बंधने घालून आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात येतील’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात