जिल्हाध्यक्षाकडून महिला सचिवाचीच पक्षातून हकालपट्टी !
- काँग्रेसच्या अध्यक्षा एक महिला असतांना त्यांच्याच पक्षात पुरुष पदाधिकार्याकडून पक्षातील महिलांचा असा अवमान होणे काँग्रेसला लज्जास्पद !
- आधी छेड काढायची आणि नंतर मारहाण झाली म्हणून महिला सचिवालाच पक्षातून काढायचे, ही काँग्रेसमधील मोगलाईच होय ! या घटनेविषयी सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा बोलतील का ?
जालौन (उत्तरप्रदेश) : येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा यांना त्यांच्याच पक्षातील महिला सचिव आणि अन्य युवती यांनी मिळून चपलांनी भर रस्त्यात मारहाण केली. या महिला सचिवाने ‘अनुज मिश्रा माझी नेहमी छेड काढत होते’, असा आरोप केला आहे. चपलांनी मारहाण होत असतांना मिश्रा म्हणत होते, ‘परत असे करणार नाही. मला सोडा’; मात्र तरीही त्यांना मारहाण करण्यात येत होती. या वेळी पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी मिश्रा यांना कह्यात घेतले. या मारहाणीचे काही जणांनी चित्रीकरण केले आणि त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. मिश्रा यांच्यावरील आरोपानंतर काँग्रेसकडून एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
१. महिला सचिवाचा आरोप आहे की, राज्याचे काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याकडे मिश्रा यांच्याविषयी तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. (एका महिलेची छेड पक्षाचा पदाधिकारी काढतो आणि त्याची तक्रार होऊनही कारवाई होत नसेल, तर असा पक्ष सत्तेत आल्यावर तरी महिलांचे रक्षण कधीतरी करू शकेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. या मारहाणीनंतर मिश्रा यांनी या महिला सचिवाला पक्षातून काढल्याची अधिकृत घोषणा केली आहे. (काँग्रेसमध्ये लोकशाही नाही, तर हुकूमशाही आहे, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात