- हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करून त्यात घोटाळे करण्याचा प्रघातच या देशात पडला आहे, तो रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन विरोध केला पाहिजे !
- हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथे मंदिरांचे सरकारीकरण होणे हिंदूंना अपेक्षित नाही, तर अशी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असली पाहिजेत !
कांगडा (हिमाचल प्रदेश) : येथील प्रसिद्ध श्री बगलामुखी मंदिराचे सरकारीकरण करण्याची शिफारस कांगडा जिल्हाधिकार्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (भाषा, कल आणि संस्कृती विभाग) यांना केली आहे. उपजिल्हाधिकारी देहरा यांच्या अहवालाचा आधार घेऊन त्यांनी ही शिफारस केली आहे. त्यानुसार आता पुढील कार्यवाही चालू करण्यात आली आहे.
१. या मंदिरातील अनियमिततेविषयी तक्रारी आल्यानंतर उपजिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली. पूर्वी अशा प्रकारची चौकशी करण्यात आली होती आणि त्यातही अनियमितता आढळली होती; मात्र त्या अहवालावर कार्यवाही झाली नव्हती, असे म्हटले जात आहे.
२. या अहवालात म्हटले आहे की, मंदिराच्या नवीन बांधकामासाठी कोणतीही अनुमती घेतली गेली नाही. या मंदिरामध्ये होणार्या धार्मिक विधींच्या खर्चांची नोंद ठेवण्यात येत नाही. येथे मोठ्या संख्येने भाविक अर्पण करतात. त्यामुळे या मंदिराचे सरकारीकरण करून तेथे प्रशासकीय अधिकारी नेमण्याची म्हणजे न्यासामध्ये त्याचा समावेश करण्याची आवश्यकता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात