-
नव्या संस्थेमध्ये एकही शीख धर्मीय व्यक्ती नाही !
-
शिरोमणी अकाली दलाकडूनही पाकिस्तानच्या निर्णयाचा विरोध
पाकचा हिंदु आणि शीख द्वेष चालूच ! याविषयी आता पाकप्रेमी खलिस्तानवादी तोंड का उघडत नाहीत कि त्यांना हे मान्य आहे ?
इस्लामाबाद (पाकिस्तान) : कर्तारपूर गुरुद्वाराच्या देखभालीचे दायित्व ‘पाकिस्तान शीख गुरुद्वारा समिती’कडून काढून ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’ या नव्या संस्थेला सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संस्थेत एकाही शीख सदस्याला स्थान देण्यात आलेले नाही. या संस्थेतील सर्व ९ सदस्य हे ‘इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड ’ (ई.टी.पी.बी.) हिच्याशी संबंधित आहेत. या संस्थेवर पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.चे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचे दायित्व महंमद तारीक खान यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. (मुसलमानांच्या एखाद्या धार्मिक स्थळाचे दायित्व एखाद्या शीख व्यक्तीकडे सोपवलेले त्यांना चालणार आहे का ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
शिरोमणी अकाली दलाकडून पाकच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला आहे. दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तान सरकारने गुरुद्वाराच्या देखभालीचे दायित्व अशा संस्थेकडे दिले आहे ज्यात एकही शीख सदस्य नाही. हे निषेधार्ह आहे. पाकमधील शीख अल्पसंख्यांकांच्या अधिकारावर ही गदा आहे.
कर्तारपूर कॉरिडोर काय आहे ?
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांनी वर्ष १५०४ मध्ये रावी नदीच्या पश्चिम तिरावर कर्तारपूर वसवले. त्यांच्या काळातील गुरुद्वारा आजही तेथे आहे. त्याला ‘दरबार साहिब’ म्हटले जाते. येथून भारताची सीमा अवघ्या काही किलोमीटरवर आहे. सीमेवरून हा गुरुद्वारा पहाता येतो. वर्ष १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेटीमध्ये येथे महामार्ग बांधण्याची चर्चा झाली होती. त्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले; मात्र याचे बांधकाम वर्ष २०१९ मध्ये पूर्ण झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात