Menu Close

कर्नाटकमध्ये ‘लव्ह जिहाद’ संपुष्टात आणू ! – मुख्यमंत्री येडियुरप्पा

राज्यात लवकरच कायदा आणणार !

बेंगळुरू (कर्नाटक) : आम्ही दैनिक आणि प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमांतून लव्ह जिहादद्वारे होणार्‍या धर्मांतराच्या बातम्या वाचल्या आहेत. मी याविषयी अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. मला अन्य राज्यांविषयी ठाऊक नाही; मात्र आम्ही हा प्रकार संपुष्टात आणू. तरुणींना पैशाचे आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या प्रकरणांना आम्ही गांभीर्याने घेतले आहे. ते नष्ट करण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलणार आहोत, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले. उत्तरप्रदेश, हरियाणा आणि मध्यप्रदेश राज्यांनंतर आता कर्नाटकातही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री बसवराज बोमानी यांनी यापूर्वीच लव्ह जिहादला ‘सामाजिक दानव’ म्हटले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *