-
ट्विटरवर #Ban_Laxmmi_Movie द्वारे विरोध !
-
राष्ट्रीय ट्रेंड हा ट्रेंड तिसर्या स्थानावर !
मुंबई : दिवाळीच्या आधी म्हणजे ९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटातून श्री लक्ष्मीदेवीचा अवमान करण्यात आला आहे. तसेच यातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे. याचा यापूर्वी विरोध झाल्याने त्याचे नाव आता केवळ ‘लक्ष्मी’ असे करण्यात आले आहे; मात्र ‘लव्ह जिहाद’ला असणारे प्रोत्साहन आणि श्री लक्ष्मीदेवाचा अवमान कायम असल्याने याला होणारा विरोध अद्यापही चालूच आहे. जोपर्यंत ‘लव्ह जिहाद’ला मिळणारे प्रोत्साहन आणि श्री लक्ष्मीदेवीच्या अवमानाचे प्रसंग काढले जात नाहीत, तोपर्यत हा विरोध कायम रहाणार आहे. त्या अनुषंगाने हिंदु धर्मप्रेमींनी ५ नोव्हेंबर या दिवशी ट्विटरवर #Ban_Laxmmi_Movie या ‘हॅशटॅग’द्वारे याला विरोध केला. हा ट्रेंड काही काळातच राष्ट्रीय ट्रेंडवर तिसर्या क्रमांकावर होता. यावर ४० सहस्रांहून अधिक जणांनी ट्वीट्स केले.
ट्रेंडवर करण्यात आलेले काही ट्वीट्स !
१. हा एक जाणीवपूर्वक करण्यात आलेला अवमान असून हे एक षड्यंत्र आहे. आम्हाला याचा विरोध करून धर्मावरील आक्रमण रोखले पाहिजे.
२. दीपावलीच्या वेळी ‘लक्ष्मी’च्या नावाने चित्रपट बनवणारे कधी ईदच्या वेळी ‘अल्ला’, ‘पैगंबर’ यांच्यावर आणि नाताळच्या वेळी ‘येशू’वर असे चित्रपट बनवण्याचे धाडस करू शकतील का ? आणि केंद्रीय परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) याला अनुमती देऊ शकते का ?
३. हा चित्रपट मूळ तमिळ चित्रपट ‘कंचना’ची हिंदी आवृत्ती आहे. त्यात राघव आणि प्रिया अशा नावाच्या भूमिका असतांना ‘लक्ष्मी’ चित्रपटात आसिफ आणि प्रिया दाखवून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे यावर बंदी घातली पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात