- भारताने छोट्याशा ऑस्ट्रियाकडून शिकायला हवे ! एकाच जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर त्याने असा निर्णय घेतला, तर भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवाद चालू आहे आणि त्याचे मूळ काही मशिदी आणि मदरसे यांमध्ये आढळल्यानंतरही भारताने एकही मशीद अथवा मदरसा यांवर कारवाई केलेली नाही, हे भारताला लज्जास्पद आहे !
- काश्मीरमध्ये वर्ष १९८९ मध्ये मशिदींमधील ध्वनीक्षेपकांवरून हिंदूंना त्यांच्या बायका आणि संपत्ती ठेवून निघून जाण्यास सांगितले गेले आणि नंतर हिंदूंचा वंशसंहार करण्यात आला; मात्र यातील एकाही मशिदीवर किंवा वंशसहार करणार्यांवर गुन्हा नोंदवला गेला नाही कि कारवाई झाली नाही, हे लक्षात घ्या !
व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) : युरोपातील ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्ना येथे २ नोव्हेंबर या दिवशी ६ ठिकाणी जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमणाच्या घटना घडल्या होत्या. यात एका आतंकवाद्यासह ७ जणांचा मृत्यू झाला होता. या आतंकवादी आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने घेतले होते. यानंतर आता ऑस्ट्रिया सरकारने देशातील कट्टरतावादी मशिदींना टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. (व्हिएन्ना येथील आतंकवादी आक्रमण आणि मुंबईत वर्ष २००८ मध्ये झालेले २६/११ चे आक्रमण यांत साम्य असल्याचे बोलले गेले; परंतु या दोन्ही घटनांची तुलना केल्यास मुंबई आक्रमणात १६६ निष्पाप लोकांची हत्या झाली होती, परंतु त्यानंतरही तत्कालीन काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने ऑस्ट्रियानुसार विशेष कारवाई कधीच केली नाही. अर्थात् ‘अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन’केंद्रीत भारतीय राजकारणामध्ये असे होणे शक्य नाही. त्यासाठी कणखर राज्यकर्त्यांची आवश्यकता आहे. मोदी शासनाने अशा प्रकारची कठोर पावले उचलणे ‘राष्ट्रप्रेमी’ भारतियांना अपेक्षित आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
यापूर्वी आतंकवादी आक्रमणाच्या भीतीमुळे नवी देहली येथील ऑस्ट्रियाचे दूतावास ११ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात